जितेंद्र आव्हाड यांची भूमिका योग्य राष्ट्रवादी चित्रपट हा सांस्कृतिक विभाग आव्हाड यांच्या पाठीशी

Khozmaster
2 Min Read

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास आमच्या नसानसात आहे.चित्रपटतुन इतिहास बदलनाऱ्या ची गये केली जाणार नाही.- बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग मुंबई-जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. शिवाय यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात जरी अनावदनाने चुकीचा उल्लेख केला तर अख्खा महाराष्ट्र याबाबतीत पेटून उठतो मात्र संपूर्ण चित्रपटाचे विद्रोपिकरण केल्यानंतर सुद्धा मनसे आणि आत्ताच सरकार जर गप्प बसत असेल तर निश्चितच चित्रपट शो बंद पाडण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन आम्ही करतो.असे मत बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाचं हृदयातलं अति महत्त्वाचे स्थान असलेलं दैवत आहे अशावेळी शिवाजी महाराजांच्या समोर छत्रपती चा उल्लेख जरी झाला नाही तर कोण बनेगा करोडपतीच्या व्यासपीठावरनं अमिताभ बच्चन सारख्या महानायकाला सुद्धा आपण माफी मागायला लावतो.असा हा महाराष्ट्र जेव्हा अख्ख्या महाराष्ट्राने हर हर महादेवाच्या चित्रपट इतिहास विसंगती बाबत दस्तरखुद्द शिवाजी महाराजांचे वंशज सुद्धा आक्षेप घेत असताना या चित्रपटांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आणि मनसे खंबीर उभा राहतो याचा अर्थ काय? हा न समजण्यापलीकडचा विषय आहे. कारण हर हर महादेव चित्रपट करणारा निर्माता बाजूला सारून आता मनसे राज्य सरकार आणि राष्ट्रवादी असा वाद पेटलाय जितेंद्र आव्हाड सारखा एक सच्चा कार्यकर्ता जर महाराष्ट्रातल्या आराध्य देवताचं ऐतिहासिक पाठ राखण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर होणारा अन्याय महाराष्ट्र कदापि खपून घेणार नाही. त्यामुळच जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निषेध नोंदवतो असे बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग यांनी कळवले आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *