पातुर प्रतिनिधी रामेश्वर वाढी
राहुल गांधी 16 तारखेला पातुर येथील जिनिंग फॅक्टरी या ठिकाणावर मुक्कामी राहणार असून 17 तारखेला सकाळी 5 वाजता काँग्रेस पक्षातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट होण्याची शक्यता आहे काही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार असल्याची माहिती मिळत आहे राहुल गांधी पातुर शहरातील पोलीस स्टेशन चौक जुने बस स्थानक या मार्गाने पायदल जात असताना वसंतराव नाईक संस्थेच्या कार्यालयात रामसिंग जाधव यांनी स्वागताची व्यवस्था केली आहे तर शहा बाबू कॉलेज चे अध्यक्ष सय्यद हाजी ईसागराई ,, पातुर नगरपरिषद काँग्रेस गटनेते हाजी सय्यद बुरान ठेकेदार यांच्यावतीने सुद्धा स्वागत उत्सुक कार्यक्रम ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे व काँग्रेस, नेते सय्यद कमरोदिन, शेख मुख्तार, सय्यद अजर सै कमृदिन यांच्या वतीने सुद्धा सांस्कृतिक व स्वागत होनार आहे , त्यानंतर नगरपरिषद माजी उपाध्यक्ष सैय्यद मुजाहिद सय्यद मोहसीन हे सुद्धा स्वागत करणार आहेत , त्यानंतर मिलिंद नगर चौकात सुद्धा स्वागत कार्यक्रम होणार अशी माहिती मिळत आहे , व पातुर शहरातील मुख्य संभाजी चौक महात्मा फुले स्मारक या ठिकाणी विशेष भव्य दिव्य स्वागत उत्सव अखिल भारतीय संघटनेने महात्मा फुले यांच्या स्मारकांना विनम्र अभिवादनाची व्यवस्था केली आहे मुख्यतः शहा बाबू कॉलेज जुने बस स्थानक संभाजी चौक व दसरा मैदान पातूरातील हे स्थळे या ठिकाणी राहुल गांधी वेळ देणार आहेत अकोला येथील साजिद पठाण यांनी सुद्धा बाहेर ठिकाणहून येणाऱ्या नागरिकांची राहण्याची व जेवणाची विशेष व्यवस्था केली आहे काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी सांस्कृतिक व्यायाम शाळेच्या माध्यमातून मल्लखांब मनोरे सादर होणार व सांस्कृतिक खडकेश्वर गणेश उत्सव मंडळाला महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक मिळाल्याने या व्यायाम शाळेला विशेष राहुल गांधीजींना कास्तकार विशेष गणपतीचे प्रदर्शनी पहावयास मिळणार आहे , या मंडळाचे राहुलजींच्या वतीने सत्कार नियोजन केल्याची माहिती काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी दिली आहे ,व सिदाजी महाराज संस्थान जवळ एजुविला पब्लिक स्कूलच्या वतीने सुद्धा स्वागत कार्यक्रम होणार आहे ईदगाह या ठिकाणी महिलांच्या वतीने स्वागत होणार आहे , दसरा मैदान येथे किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या वतीने सुद्धा भव्य असे स्वागत होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते प्रकाश तायडे, चंद्रकांत बारताशे, बंटी गेहिलोत, विलास देवकर, यांनी दिली आहे या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा राहुल गांधीजींच्या भारत जोडो यात्रे मध्ये संपूर्ण अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सहभाग घेण्याकरिता काँग्रेस नेते यांनी आवाहन केले आहे.
Users Today : 38