प्रतिनिधी :- योगेश नागोलकार
पातूर:-चालू नोव्हेंबर महिन्यात मुद्दत संपलेल्या ग्रा.पं,च्या निवडणुकचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.यात पातुर तालुक्यातील २८ ग्रा पं चा समावेश आहे.ह्या २८ ग्रामपंचायत च्या सरपंच पदांची थेट जेनतेतून निवडणूक 18 डिसेंबर रोजी होणार आहे.तर तिसरे दिवशी 20 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.या टप्यात पातूर तालुक्यातील पुढील 28 ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे.यात खामखेड,नांदखेड,आगीखेड,गोंधळवाडी,सावरखेड,माळराजुरा,अंबाशी,आसोला,शेकापूर,पांगरताटी,झरंडी,गावडंगाव,पिपंळडोंळी,पाढुंर्णा,जांब,बाभुळगांव,तांदळी खुर्द,बोडखा, नवेगाव,अंधारसांगवी,चोंढी,कार्ला,पाडसिंगी, सावरगाव,खेटरी,सुकळी,वाहळा बु,तुलंगा खुर्द,या ग्रामपंचायतचा निवडणूक होण्यात समावेश आहे. ग्रामपंचायतची निवडणूक आदी मतदानाने झाली होती. मात्र आता थेट जनतेतून होणार आहे.तेव्हा भाजप सेना युतीचे सरकार होते मधात महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर त्यांनी निर्णय बदलला होता.पण पुन्हा आता सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने थेट जनतेचा निर्णय लागू केला. त्यामुळे आता ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आगामी निवडणूक पुन्हा थेट जनतेतूनच होत आहे. आज निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन अर्ज भरणे 7 डिसेंबर रोजी रिंगणात कायम राहिलेल्या उमेदवारांचे अंतिम यादी जाहीर करून दुपारी चिन्ह वाटप करण्यात येईल. 18 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान घेण्यात येईल 20 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर निकाल जाहीर करण्यात येईल. या ग्रामपंचायत च्या निवडणुकीत मतदानाला दोन शक्ती मारावे लागतील एक सरपंच पदासाठी तर दुसरा त्यांचे प्रगती सदस्याला मध्यव लागेल राज्यात सध्या सत्ता बदल झालेल्या असल्याने ग्रामीण भागात सुद्धा या सत्ता बदलाचा परिणाम झाले यांचे दिसून येत असल्याने व अशाच सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून असल्यामुळे 18 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक फारच गाजणार- वाजणार असल्याची शक्यता आहे.
Users Today : 38