अकोला येथे वारकरी साहित्य परिषदेचा अकरावा वर्धापन मोठया उत्साहात संपन्न.

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी अशोक भाकरे
वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र चा , 11 वा वर्धापन दिन सोहळा, कंचनपुर अकोला जि. अकोला येथे ह.भ.प.विठ्ठल पाटील (काकाजी) यांचे मार्गदर्शनाखाली मोठया उत्साहात संपन्न झाला. अकरावा वर्धापन दिना निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी ह.भ.प.गुरूवर्य मल्लीकार्जुन आप्पा महाराज यांचे हस्ते ग्रंथ पुजन, विणा पुजन व सम्मेलन उदघाटन झाले. पारायन सोहळा ह.भ.प. जगदीश (लल्ला) महाराज यांचे हस्ते घेण्यात आले. संत गजानन महाराज महिला मंडळ यांनी सहभाग घेतला.तसेच वारकरी संप्रदायाच्या सेवेबद्दल विठ्ठल वारकरी पुरस्कार अकोला पंचायत समिती सभापती मा. सुलभाताई सोळंके यांचे हस्ते देऊन जेष्ठ महाराज मंडळींना सन्मानीत करण्यात आले, संपर्क प्रमुख जितेंद्र कोलप यांनी वारकरी साहित्य परिषद चा मागील दहा वर्षाचा इतिहास व पुढील धोरणे आपल्या प्रास्ताविकात मांडले, या वेळेस अकोला जिल्हाध्यक्ष ह.भ.प. शिवशंकर महाराज पाटील, ह.भ.प.राजेंद्र महाराज वकटे, ह.भ.प.विठ्ठल महाराज महल्ले, भगवान महाराज साबळे, गोपाळ महाराज बदरखे, लक्ष्मण महाराज म्हावरे, अवधूत महाराज पारसकर,अमोल महाराज बांगर, मनोहर महाराज वाघमारे, मोहन महाराज वाघमारे आदी उपस्थित होते. ह.भ.प.मल्लीकार्जुन आप्पा महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. संत गजानन महाराज मंदिर येथून पायी दिंडी काढण्यात आली, यामध्ये अकोला, कंचनपुर, माजरी, मुर्तीजापुर, राजापूर,खांबोरा, मोरझाडी, हातरून, या गावच्या दिंड्या सहभागी होत्या, सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गजानन महाराज मंदिर येथून पायी दिंडी काढण्यात आली परिसरातील सर्व, दिंडी झाल्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाचे सांगता झाली.
0 9 4 7 9 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *