तेल्हारा तालुक्यात  रब्बी पेरणीला सुरूवात शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी..

Khozmaster
2 Min Read
रितेश कुमार टीलावत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यात यावर्षी अति पावसामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा या पिकांच्या पेरणीला उशिरा सुरुवात झाली असून, शेती पुन्हा तयार करावी लागली. जमिनीमध्ये जास्त ओलावा असल्याने व मागील पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात गवत झाले होते. त्या कारणाने शेती तयार करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला असून, पेरणी करण्यात येत आहे. या वर्षी मूग, उडीद, सोयाबीन व कपाशी या पिकांना विविध रोगांनी व अति प्रमाणात पावसाने नुकसान केले. काही शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघाला नसून, त्यांनी त्या पिकांबर ट्रॅक्टर मारून रब्बीसाठी तयार करून घेतली. महागाईचे बी बियाणे, रासायनिक खते आणून पेरणी करत असून त्यावर रानटी डुक्कर या परिसरात आतापर्यंत कोणतीच सरकारी मदत मिळाली नसून फक्त घोषणाबाजी झाली आहे. अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर जमीन खरडून गेली . पीक विमा मिळाला नाही. सोयाबीन पीक पूर्णपणे गेले . अशी भयावा परिस्थिती येथील शेतकऱ्यांची दिसत असून शेतकरी रात्रीला शेतात जात आहेत. काही शेतकऱ्यांची सर्व स्वप्न आता रब्बी पिकावर असून, पुढे किती संकटांना तोंड द्यावे लागते आणि हवामान किती साथ देते यावर अवलंबून आहे., आता कपाशीवर सुद्धा लाल्याने अटॅक केला असून, उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. मजुरीचे वाढते दर या खर्चाचे ताळमेळ लावले तर हातात काहीच उरत नसून नुसते रोजगार हमी योजना चालू आहे. शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीस आला आहे. तेव्हा शासनाने या सर्व गोष्टीचा विचार करू शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या पिकाला भाव देऊन मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जोडधरीत आहे., जेणे करून जगाचा पोशिंदा समजणाऱ्या शेतकरी आत्महत्याj कर्जबाजारी होणार नाही. याकडे लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा आपले जातीने लक्ष द्यावे, अशी परिसरातील लाखो शेतकऱ्यांची मागणी आहे.
0 9 4 7 9 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *