राष्ट्रीय लोक अदालत दिनी ९ हजार ७६ प्रकरणे निकाली

Khozmaster
2 Min Read

26 कोटी 8 लाखांचा केला दंड वसूल

अकोला (भुषण महाजन)- अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आज राष्ट्रीय लोकअदालतीस प्रारंभ झाला असून ९०७६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात खटलापूर्व प्रकरणात तडजोड होवून २६ कोटी ८ लाख १८ हजार ३४९ रुपयांची वसुली झाली, अशी माहिती जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार दि. 12 नोव्हेंबर राष्ट्रीय लोक अदालतीस प्रकरणे निकाली काढण्यात आले. अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ३९ हजार ८०८ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडीकरिता ठेवण्यात आली. यापैकी  ९ हजार ०७६ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर खटलापूर्व प्रकरणात तडजोड होवून २६ कोटी ८ लाख १८ हजार ३४९ रुपयांची वसुली झाली आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित ३९ हजार ८०८ प्रकरणांपैकी १ हजार ४२२ प्रलंबित प्रकरणात व एकूण ७ हजार ६५४ दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून ९ हजार ०७६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी स्वरूपाची तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम १३८ एन. आय. ॲक्ट तसेच ग्रामपंचायत घरपट्टी/ पाणीपट्टी व महानगरपालिकांचे कर वसूलीचे तसेच बी.एस.एन.एल. व बॅकांच्या खटलापूर्व प्रकरणात तडजोड होवून २६ कोटी ८ लक्ष १८ हजार ३४९ वसुल झाले आहेत, असे श्री पैठणकर यांनी सांगितले.

जिल्हा न्यायालयात आयोजित लोक अदालतीमध्ये श्रीमती सुवर्णा केवले व जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश उपस्थित होते. लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालयात २९ पॅनलची व्यवस्था करण्यात आली . यात निगोशिएबल इन्सट्रुमेन्टस् ॲक्ट च्या कलम -138 खाली दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे ,कामगार वाद प्रकरणे, विज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे,  कोर्टात प्रलंबित प्रकरणे तसेच लोक अदालतीच्या मार्फत विधी विषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *