अकोट प्रतिनिधी विशाल गवई
अकोट तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा गव्हासारख्या पिकांच्या पेरणीपूर्वी आवश्यकतेनुसार रासायनिक व जैवीक बुरशीनाशकाची कृषीतज्ञांच्या मार्गदर्शनात बीजप्रक्रिया करुणच पेरणी करावी असे आवाहन शेतकरी मित्र जगन बगाडे व कृषी मंडळ अधिकारी अतुल भारसाकडे ,गणेश निगोडे, फोकमारे अकोट कृषी विभाग यांच्याकडून करण्यात, आले आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची काढणी जवळपास आटोपली असून, बळीराजा आता रब्बी पीक लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. यावर्षी जुलै, ऑगस्ट, महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची पिके खरडून गेली. कुठे कुठे बीज उगवण प्रक्रिया झाली नसल्याने जमिनी पडीक राहिल्यामुळे हे क्षेत्र यावर्षी रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका, ज्वारी कांद्यासारख्या पिकाखाली येऊन रब्बी हंगामात वाढ होत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. खरीप हंगामात बसलेला फटका रब्बीचा हंगाम भरून काढेल या आशेने बळीराजा रब्बीच्या जय्यत तयारीला लागला आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या संततधार, व अतिपावसामुळे शेतकऱ्यांना शेतमशागत करता आली नाही. त्यामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण पाहूनच पेरणी करावी. यावर्षी पाऊस जास्त असल्याने, पिकावर विविध हानिकारक बुरशीची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमिनीतील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्माच बियाण्यास प्रक्रिया करावी. किंवा कार्बेन्डाझि(२४टक्के)मॅन्कोझेब (५० टक्के डब्ल्यूएस) या संयुक्त बुरशीनाशकाची तसेच रब्बी हंगामातील हरभरा गव्हासारख्या पिकांच्या पेरणीपूर्वी आवश्यकतेनुसार रासायनिक व जैवीक बुरशीनाशकाची कृषीतज्ञांच्या मार्गदर्शनात बीज प्रक्रिया करा. असे शेतकरी मित्र जगन बगाडे याचे आव्हान..
Users Today : 15