शिवाजी कॉलनीतील  ढाप्याकडे  पालिकेचे दुर्लक्ष.. 

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी 
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: नंदुरबार शहरातील स्टेट बँके शेजारील शिवाजी कॉलनीतील उघड्या ड्रेनेज वरील  ढाप्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे  किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
 या समस्येकडे प्राधान्यं लक्ष देण्याची
मागणी शिवाजी कॉलनीतील रहिवाशांकडून होत आहे.शिवाजी कॉलनीतील प्लॉट क्रमांक चार ब येथील रहिवासी डॉ. तुकाराम  पटेल यांच्या घरा समोर
 गटार गेल्या ३ ते साडेतीन महिने पासुन उघडी आहे. त्यात लहान मुले खेळताना दगड ,कचरा , इतर वस्तु  टाकत असतात  ,एकदा एका गाडीचे चाक गटारी मध्ये काॅनरवर अडकले होते. मागील महिन्यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी  यांनी नवीन रस्ता भुमीपुजनासाठी आले  तेव्हा त्यांना प्रत्यक्षात दाखविले. तेव्हा झाकण एका आठवड्यात तयार झाले की लावून देतो असे  सोबत आलेले नगरपालिका कर्मचारी यांनी सांगितले होते. व प्रत्यक्षात  या गटारी वर झाकण लावायचे सोडुन बंगला नंबर तीन येथे झाकलेली गटारीचे झाकण बदलून दिले व त्या गटारीचे झाकण उघडेच आहे. लहान मुले वा कोणीहि पडले तर अपघात होत असतात. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी शिवाजी कॉलनी परीसरातील नागरीकांनी केली आहे.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *