परमेश्वराच्या नामस्मरणाने जीवन सार्थक होते : उज्वल जोशी..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण 
नंदुरबार -: हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा या उक्तीप्रमाणे परमेश्वराच्या नामस्मरणाने जीवन सार्थक होते.शहरी भागातील भाविकांनी देखील ग्रामीण भागाप्रमाणे प्रातप्रहरी लवकर उठून दिनचर्या सुरू करावी असे प्रतिपादन हरिदास उज्वल वसंत जोशी महाराज यांनी केले.
शहरातील शारदा नगर भागात चौधरी परिवारातर्फे  श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह सुरु आहे. कथेचे निरूपण कोठली खुर्द येथील श्रीराम मंदिर संस्थांनचे हरिदास उज्वल वसंत जोशी महाराज करीत आहेत.श्रीमद् भागवत कथाप्रसंगी तबला वादक खुशाल पाटील, हार्मोनियम  चंद्रकांत टेंभेकर,(शहादा), सिंथेसायझर अशोक सोनवणे,ध्वनी व्यवस्था बंडू चौधरी, (निमगुळ) पुरोहित योगेश किल्लेदार करीत आहेत.श्रीमद् भागवत कथा गोमती निवास, प्लॉट नंबर 26, शारदा नगर,   जाणता राजा चौकच्या पुढे नंदुरबार येथे दररोज दुपारी दोन ते साडेपाच वाजेपर्यंत आहे.बुधवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता कृष्णाष्टमी श्री गोपाळकृष्ण भगवंतांचा प्राकट्य महोत्सव होईल.  शनिवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्रीमद् भागवत कथा समाप्ती निमित्त महाप्रसाद वितरण होईल.भाविकांनी श्रीमद् भागवत कथा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक  चौधरी परीवार यांनी केले आहे.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *