प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: शहरातील मंगळ बाजारातील मोहनसिंगभैय्या व्यापारी संकुलात कार्यान्वित कै. मोहनसिंगभैय्या परदेशी सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक किरण नामदेव चौधरी तर उपाध्यक्ष म्हणून संजय वेडू चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
दि. 13 नोव्हेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष महेंद्रभाई मंगाभाई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत कै.मोहनसिंगभैय्या परदेशी सार्वजनिक वाचनालयाची नूतन कार्यकारणी गठित करण्यात आली.अध्यक्षपदी माजी नगरसेवक किरण नामदेव चौधरी,उपाध्यक्ष संजय वेडू चौधरी,कार्याध्यक्ष महादू विठ्ठल हिरणवाळे,कोषाध्यक्ष संजय रघुनाथ भदाणे,सचिव प्रेमचंद डि.राजपूत, संचालक मोतीलाल साखरचंद ओस्तवाल,विनोदकुमार बाफना,पप्पूभैया भक्तीराम अग्रवाल,श्रीकांत शंकरराव चौधरी,सुरेश मंगा चौधरी,भगवान मंगा चौधरी,प्रवीण रामदास पाटील,दीपक महेश मराठे, मुकेश मोतीराम चौधरी आणि महिला प्रतिनिधी म्हणून सुलभा महिरे – पाने,सल्लागार रविंद्र मोहनसिंग परदेशी, विजय असोदेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
Users Today : 39