प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:शहरातील गणेश नगरात चोरट्याने घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार येथील शेख अख्तर शेख अमीर पिंजारी यांचे कोरीट रस्त्यावरील गणेश नगरात घर आहे .
सदर घराच्या संडासाच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्याने घरात प्रवेश केला . यावेळी घरातील बॉक्स पलंग मध्ये असलेल्या लोखंडी पेटीतील १ लाख ६६ हजार रुपये किंमतीचे ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने , १४ हजार रुपयांची रोकड व दोन हजार रुपये किंमतीचे लेडीज व जेन्टस ड्रेस असा एकूण १ लाख ८२ हजाराचा ऐवज चोरुन नेला .याबाबत शेख अख्तर शेख अमीर पिंजारी यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८० , ४५४ , ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देविदास सोनवणे करीत आहेत .
Users Today : 39