जि.प.शाळेची खिडकी तोडुन टिव्ही लंपास.

Khozmaster
1 Min Read
Vector illustration of a television with remote against a blue background in flat style.
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:जिल्हा परिषदेच्या शाळेची खिडकी तोडुन चोरट्यांनी टिव्ही चोरुन नेल्याची घटना तिनसमाळ येथे घडली . याप्रकरणी अनोळखीविरुध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . धडगांव तालुक्यातील तिनसमाळ येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे .या शाळेचा वर्गाचे पुर्वेकडील खिडकीचे गज तोडुन चोरट्याने आत प्रवेश केला . यावेळी वर्गातुन 9 हजार रुपये किंमतीचा टिव्ही चोरुन नेला आहे .
    याबाबत मंगेश राज्या पाडवी यांनी धडगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार अनोळखी विरुध्द भादंवि कलम 454 , 457 , 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
  पुढील तपास पोना . शशिकांत वसईकर करीत आहेत
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *