प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार –:नंदुरबार ते तळोदा रस्ता दुरुस्तीसाठी गैर कायद्याची मंडळी जमवून विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार ते तळोदा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता दुरुस्तीसाठी गैर कायद्याची मंडळी जमवून विना परवानगीने व महाराष्ट्र हद्दीत रास्ता रोको आंदोलन करुन वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दिलीप रघुनाथ पाटील , अधिकार भटा पाटील , आंबालाल तुकाराम पटेल , शांतू मोत्या पाडवी , सुरेश जम्मू पाडवी , उद्धव तुमडू पटेल , दगडू नारायण चौधरी , राकेश पाटील ,प्रदिप नाना पाटील , दीपक भरत पाटील , खंडू वसंत पाटील , खंडू इमा पाडवी , नितीन सजन पाटील , जगदिश रविंद्र भोई , भरत रोहिदास चौधरी , संदिप पाडवी , शरद राजपूत , अश्विनभाई पटेल व सुभाष पटेल यांच्यासह २० अनोळखी इसमांविरोधात नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १४१ , १४३ , १४५ , ३४१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत .
Users Today : 39