प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:अक्कलकुवा तालुक्यातील डिगीआंबा येथील शेत शिवारातून चोरट्याने २५ हजार रुपये किंमतीची जलपरी मोटार चोरुन नेली . याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , अक्कलकुवा तालुक्यातील रांझणी येथील केसरसिं जवानसिंग वळवी यांचे अक्कलकुवा तालुक्यातील डिगीआंबा येथील शेत शिवार सर्व्हे क्र . ७ / २ मध्ये शेत सदर शेतातून चोरट्याने २५ हजार रुपये किंमतीची ३ हॉर्स पॉवरची जलपरी मोटार चोरुन नेली .याबाबत केसरसिंग वळवी यांच्या फिर्यादी वरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोना.सुनिल पवार करीत आहेत .
Users Today : 39