राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसात तडजोडीने साडे तीन हजार प्रकरणे निकाली , साडे सहा कोटीचा दंड वसूल..

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:नंदुरबार जिल्हयातील सर्व न्यायालयातील तडजोडक्षम प्रलंबित फौजदारी , दिवाणी , मोटार अपघात दावे प्रकरणे , वाहतुक नियमन प्रकरणे , व दाखलपुर्व प्रकरणांमध्ये वीज , पाणीपट्टी , घरपट्टी व बँका यांचे थकीत बिले यांची ३२५८ प्रकरणे शनिवार दि . १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.यांत ६ कोटी ४० लाख ३४ हजार ७४० रुपये वसुल करण्यात आले . सदर लोकन्यायालयाच्या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्या.आर.एस.तिवारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डि.व्ही हरणे , यांचे उपस्थितीत नंदुरबार मुख्यालयात तदर्थ जिल्हा न्यायाधीश -१ आर.जी.मलशेटटी , मुख्य न्यायदंडाधिकारी न्या . व्ही.जी. चव्हाण , वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्या . आर . एन . गायकवाड , कनिष्ठ स्तर २ रे सह दिवाणी न्या.एन.बी. पाटील , अदि उपस्थित होते .
    मदतीसाठी अॅड . एस.व्ही.गवळी , अॅड.पी.एस.पाठक , अॅड.शुभांगी चौधरी , ॲड.सीमा खत्री , अॅड . सुनीता पिंपळे , यांनी सदस्य म्हणुन काम पाहिले.तसेच सदर लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयातील प्रबंधक एच.व्ही.जोशी , वकिल संघाचे अध्यक्ष अॅड . पी.बी. चौधरी , जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक डी.पी. सैदाणे , न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ यांनी मोलाचे सहकार्य केले . सदरच्या लोकन्यायालयात ३२५८ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येवून ६ कोटी ४० लाख ३४ हजार ७४० रुपये वसुल करण्यात आले . दिवाणी , मोटार अपघात प्रकरणे , चलनक्षम धनादेश प्रकरणे , कौटूंबिक वाद प्रकरणे , फौजदारी प्रकरणे , भुसंपादन प्रकरणे , व इतर किरकोळ फौजदारीचे ३८ ९प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात ४ कोटी ९लाख ५६ हजार ७४५ रूपये तर बॅक वसुली प्रकरणे , वीज थकबाकी वसुली प्रकरणे , पाणीपटटी , घरपटटी थकबाकी वसुली , टेलिफोन आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट , मुथुट फायन्सास सह २८६ ९ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात २ कोटी ३० लाख ७७ हजार ९९ ५ रुपये वसुल करण्यात आले .
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *