प्रतिनिधी विशाल गवई अकोट
वंचित बहुजन आघाडी आकोट चे उपाध्यक्ष लखन इंगळे यांच्या नेतृत्वात श्री कॉलेनी येथील नागरिकांचे उपोषण
गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी उपविभागीय अधिकारी आकोट व मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांना निवेदन दिले आहे निवेदनात मागणी अशी होती की श्री कॉलेनी येथील नागरिक यांनी अगोदर घरा समोरील सचलेले सांडपानी व नाली बांधकाम विषयी दि.18.5.2021 व दि.20.12.2021 रोजी निवेदने दिली होते पण त्यावर आता परियंत आरोग्य विभाग व बांधकाम विभाग न.प. आकोट यांनी तात्पुरत्या स्वरूपात कागदोपत्री देखावा केला असुन कोणत्याही प्रकारे कामे मार्गी न लावता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळीत आहेत यांच्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन बरेच वेळा येथील नागरिक नगर परिषद येथे चेकरा मारीत होते व न. प.येथील संबंधित अधिकारी हे नागरिकांना उडवा उडवीचे उत्तरे देत होते याची माहिती येथील नागरिकांनी लखन इंगळे यांना दिली असता नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी संबंधित अधिकारी यांनी 10 दिवसात नागरिकांचे घरा समोरील सांडपान्याचे काम मार्गी लावले नाही तर दि.24.11.2022 रोजी येथील रहिवाशी नागरिक नगर परिषद आकोट येथे उर्मिला शिवाजी भदे, वर्षा रवींद्र इंगळे, सुरेश भिमराव किरडे, नारायण झाबूजी इंगळे हे उपोषण करतील काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा निवेदन देते वेळी लखन इंगळे व नागरिकांनी दिला
Users Today : 11