बालकांना शालेय शिक्षणासोबत इतर क्षेत्रामधील ज्ञान देखील महत्वाचे,न्यायाधीश कुरेशी  

Khozmaster
2 Min Read
मुर्तिजापूर
दि . 14/11/022 – विधी सेवा सप्ताहा अंतर्गत मुर्तिजापूर येथे दिनांक 31 ऑक्टोबर 22 ते 14 नोव्हेंबर 22 या कालावधीत तालुका विधी सेवा समिती आणि विधीज्ञ मंडळ , मुर्तिजापूर यांचे संयुक्त विदयमाने कायदेविषयक शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते . या कालावधीत विवीध कायद्यांची व योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली . आज बालक दिनानिमीत्त कायदेविषयक शिबीर संत गाडगेबाबा विदयालय , मुर्तिजापूर येथे आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष्यस्थानी श्री . एम.झेड.ए.ए.क्यू . कुरैशी , दिवाणी न्यायाधीश , मुर्तिजापूर हे होते . तसेच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री . यु.पी. हिंगमिरे , सह दिवाणी न्यायाधीश , श्री बोचरे , मुख्याध्यापक , श्री . सचिन वानखडे , विधीज्ञ , श्री कुंदन वानखडे , श्री . सोमाणी , विधीज्ञ व श्री पंकज जामनिक विधीज्ञ हे होते . या प्रसंगी श्री . यु.पी.हिंगमिरे , सह दिवाणी न्यायाधीश यांनी बालकांचे मुलभुत अधिकार , बालकांचा शिक्षणाचे अधिकार या विषयावर विस्तृतपणे माहिती दिली . त्याचप्रमाणे श्री सचिन वानखडे , विधीज्ञ यांनी संविधानाचे महत्व व संविधान सर्व नागरिक व विदयार्थ्यांनी कसे अभ्यासपूर्ण दृष्टीने महत्वाचे आहे हे समजाउन सांगुन आज संविधान व त्यातील प्रावधाने सर्व नागरिकांना माहित असणे कसे आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती दिली . आपले अध्यक्षीय भाषणामध्ये श्री . एम.झेड.ए.ए.क्यू . कुरैशी यांनी बालकांना बालक दिनाच्या शुभेच्छा देउन आज विदयार्थ्याना शालेय शिक्षणासोबतच इतर ही क्षेत्रामधील ज्ञान का आवश्यक आहे हे समजाउन सांगुन विदयार्थ्यानी शालेय शिक्षणासोबत इतर क्षेत्रामधील ज्ञान संपादन केल्यास हे विदयार्थी देशाचे भविष्य उज्वल करतील हयाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले . 1 कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . प्रदीप देशमुख , सहायक अधिक्षक यांनी केले . यावेळी गाडगेबाबा विदयालयातील सर्व शिक्षक वृंद , कर्मचारी वृंद , विदयार्थी तसेच अनेक विधीज्ञ उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्री . डी.आर. शेगोकार , क.लि. विधी सेवा समिती , मुर्तिजापूर व इतर न्यायालयीन कर्मचारी यांनी हातभार लावला ..
0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *