प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातुर
पातुर ते बाळापुर महामार्गावरून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मार्ग नियोजित असून या रस्त्यालगतच पातूर शहरात मोठ्या प्रमाणात स्थानिक व्यवसायिकांद्वारे मोठ्या प्रमाणात आतिक्रमण झाले असुन वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना ये-जा करणे कठीण झाले आहे.पातूर शहरातुन जाणाऱ्या अकोला ते वाशिम व बाळापूर ते पातूर या रस्त्यांवर फेरीवाले व्यवसायिक तसेच काही व्यापारी संकुल मध्ये असलेल्या गाडेधारकांकडून मुख्य रस्त्यालगत टिनशेड टाकून अतिक्रमण केलेले आहे.सदर अतिक्रमणामुळे सामान्य जनतेस दर शनिवारी पातूरचा आठवडी बाजार असलेल्याने शहरात गर्दी होऊन बरेच वेळा वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार काही नवीन नसून आजपर्यंत संबंधित यंत्रणांनी याकडे हेतुपुरस्सर पणे दुर्लक्ष केले होते.
आतापर्यंत पर्यंत झोपी गेलेल्या प्रशासकीय यंत्रणा आज जागी होऊन अतिक्रमण काढण्यासाठी सज्ज झाल्या असून संबंधित अतिक्रमण धारकांना रविवार दि.१३/११/२०२२ रोजी पर्यंत स्वतःहुन अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या असून अतिक्रमण नं काढल्यास प्रशासणाच्या वतीने काढण्यात येईल असे आवाहन केले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पातूर शहर हे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे मात्र आजपावेतो न.प.पातूर,महसूल विभाग व ग्रामपंचायत शिर्ला अखत्यारीत येत असलेल्या शहरी भागातील अतिक्रमण काढण्याची संबंधित विभागाने तसदी घेतली नाही,मात्र खासदार राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रेचे पातुर शहरात आगमन होत असून राहुल गांधी हे १६ नोव्हेंबर ला पातुर शहरात येणार असुन त्यांनी सुरु केलेल्या पदयात्रेला पातूर शहरात भव्यदिव्य स्वरूप प्राप्त होणार असून पातूर शहरातून जवळपास ३५ ते ४० हाजारांच्या समूहात ऐतिहासिक पदयात्रा निघणार असल्याचे स्थानिक काँग्रेस पदाधिकारी यांच्या वतीने माहिती मिळाली असल्यानेच प्रशासनाच्या वतीने रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. या यात्रेत हजारो नागरीकांचा सहभाग असुन मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे .या निमित्ताने आज दी. ११ नोव्हेंबर रोजी महसुल विभाग , शिर्ला ग्राम पंचायत , सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पाहणी करुन महामार्गा शेजारील अतीक्रमाण काढण्याच्या सूचना केल्या असुन रविवार पर्यंत अतिक्रमण धारकांनी स्वतःहुन अतिक्रमण काढुन घ्यावे अन्यथा सोमवारला प्रशाषन स्वताहुन अतिक्रमण काढण्याचा सुचना व्यवसाईकांना देण्यात आल्या आहेत.
Users Today : 45