पालगर : सौरभ कामडी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत असलेल्या नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीत घरी येऊन सुट्या सम्पून देखील काही शाळा ह्या चालू झालेल्या नाहीत यामुळे शाळा नेमक्या कधी चालू होतील हा संभ्रम पालक व विदयार्थी यांच्या मनात झालेला दिसून येत आहे.आदिवासी समाज हा समाजाच्या मुख्यप्रवाहात यावा तो ही उच्चशिक्षित व्हावा या साठी शासन स्तरावरून विविध उपयोजना व विविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात. परंतु यालाच कुठे तरी वेळखावू पणा केला जात आहे हे बघण्यास मिळत आहे असाच प्रकार जव्हार प्रकल्पातील नामांकीत शाळेतील विद्यार्थी दिवाळीच्या सुटीत घरी आल्यानंतर प्रत्येक नामांकीत शाळा ह्या चालू झाल्या असुन आदिवासी विकास विभागाच्या काही नामकीत शाळा मात्र बंद ठेवलेल्या आहेत यामुळे सर्व पालक जव्हार प्रकल्प येथे एकत्र येऊन त्यांनी मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसान व होणाऱ्या गैरसोयी बाबत व विविध अडचणी मांडल्या आहेत आणि मुलांच्या शाळा लवकर चालू व्हाव्यात या साठी त्यांनी निवेदनात कळवलं आहे. जर ह्या प्रमाणे झाले नाही तर येणाऱ्या 21 नोव्हेंबर ला विद्यार्थ्यांनसहित पालक सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलनाला बसणार आहेत असा सर्व पालकांनी निर्णय घेतला आहे.
Users Today : 28