सिंधुताईंचा आदर्श जोपासत निरंतर वृध्दांची सेवा सुरु वृध्दाश्रमातील वृध्दांच्या हस्ते शालेय साहीत्य वाटप

Khozmaster
2 Min Read

चिखली:- अनाथांसाठी सेवा कार्य करणार्‍या भारतीय सामाजीक कार्यकर्त्या पद्मश्री माईसाहेब सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या कार्याचा जास्तीत जास्त प्रचार करुन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वृध्दांची अविरत सेवा करु असे प्रतिपादन तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक प्रशांत डोंगरदिवे यांनी व्यक्त केले.ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे निराधा बेघर अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्या जयंती व बाल दिना निमीत्त बालकांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ आशाताई डोंगरदिवे तर प्रमुख मार्गदर्शक प्रशांत डोंगरदिवे तर प्रमुख उपस्थीतीत सौ रुपाली डोंगरदिवे, कावेरी डोंगरदिवे, सौ. संगीता वानखडे हे होते.या वेळी सिंधुताई सपकाळ यांच्या जिवनावर प्रकाश टाकतांना ताईचे जिवनपट विशद करत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जीवात जीव असेपर्यंत वयोवृद्धांची अविरत सेवा करु असे मत प्रशांतभैया डोंगरदिवे यांनी व्यक्त केले.

भोकर गावाचे नाव हे जिल्हयात नव्हे तर देशात नावलौकीक करण्यासाठी बालकांनी खुप अभ्यास करावा मोठ मोठे अधिकारी व्हावे असा मोलाचे मार्गदर्शन सौ रुपाली डोंगरदिवे यांनी केले. यावेळी भोकर येथील शाळकरी बाल विदयार्थांना वृध्दाश्रमातील वृध्दांच्या हस्ते शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.यावेळी कु. शर्वरी गजानन डोंगरदिवे हीने माॅ साहेब जिजाऊंची वेषभुषा परिधान करून सर्वांचे मन जिंकले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिकेत डोंगरदिवे तर आभार प्रदर्शन कु.प्रियंका वानखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्यन डोंगरदिवे, प्रेम डोंगरदिवे, विश्वजीत वानखडे,आदेश डोंगरदिवे, अभय डोंगरदिवे, अनिकेत डोंगरदिवे, शौर्य डोंगरदिवे, आश्वजीत काळे, शैलेष वानखडे, सृष्टी कर्‍हाडे, दिक्षीता कर्‍हाडे, सांची डोंगरदिवे, नव्या घेवंदे, दिव्या डोंगरदिवे, खुशी डोंगरदिवे, तनुजा कर्‍हाडे, आचल डोंगरदिवे, कोमल डोंगरदिवे, पायल डोंगरदिवे, आरती डोंगरदिवे, योगीता डोंगरदिवे यांनी परीश्रम घेतले.

 

0 9 4 6 7 9
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *