धरणे आंदोलन आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सर्वसाधारण प्रवर्गातील 10टक्के आरक्षण देण्याचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला आहे या निर्णया विरोधात वंचित बहुजन आघाडी सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणीने बंड केले आहे.श्रद्धयेय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेश अध्यक्ष सौ रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार तसेच राज्य उपाध्यक्ष सौ सविताताई मुंढे व पक्ष निरीक्षक राज्य उपाध्यक्ष मा.धैर्यवर्धन फुंडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ जाधव व युवा जिल्हा अध्यक्ष सतिष भाऊ पवार व महिला जिल्हा अध्यक्ष सौ अलका ताई जायभाये व तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे व कार्यकारणी यांच्या नेतृत्वाखाली सिंदखेडराजा तालुका येथे धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणी सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी तहसीलदार मा.सुनिल सावंत साहेब यांना निवेदन देण्यात आले .यावेळी महिला आघाडी तालुका कार्यकारिणी युवा कार्यकारिणी शहर कार्यकारिणी सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 29