जय बजरंग विद्यालय चान्नी येथे
योगेश नागोलकार राहेल
पातुर पंचायत समिती अंतर्गत येथ असलेल्या जय बजरंग विद्यालय चान्नी येथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीचे जनक वस्ताद लहूजी साळवे आणि पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. इंगळे सर होते . प्रमुख अतिथी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वाघमारे साहेब व व त्यांचे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. शिरसाट सर यांनी केले व लहुजी साळवे यांच्या कार्याची सखोल माहिती दिली. लहुजी साळवे यांचे पुर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात किल्ले पुरंदरची जबाबदारी सांभाळत होते . लहुजी साळवे यांनी पुण्यात नानापेठ येथे आखाडा सुरू केला होता . या आखाड्यात म. फुले , टिळक, वासुदेव बळवंत फडके इत्यादी थोरांनी कुस्ती, तलवारबाजी, दांडपट्टा यासारखे युद्ध कौशल्ये आत्मसात केले अशी माहिती चान्नी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार वाघमारे साहेब यांनी दिली तसेच मुलांना पुष्पगुच्छ व खाऊ देऊन बालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये शाळेचे प्राचार्य श्री इंगळे सर यांनी आपल्या भाषणातून मुलांना मार्गदर्शन केले.
पंडीत नेहरू व बालक यांची माहिती देऊन*बालकं दिनानिमित्त प्रत्येकाने बालकांना सन्मानाने वागवावे आणि आपल्यातील बालक सदैव जिवंत ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ( वय 17 वर्षे खालील ) मुलांनी विजयश्री प्राप्त केली. त्याबद्दल चान्नी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री.वाघमारे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच त्यांना रोख 500 रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. सोबत जिल्हास्तरावर विजयी झाल्यास रोख दोन हजार रुपयाचे बक्षीस देण्याचे आश्वासन दिले. तसेच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांचे सुद्धा दोनशे रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच बोचरे सर व खडके सर यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 45