प्रविण चव्हाण नंदुरबार.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांच्या शहादा येथील राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी एक शासकीय सर्विस पिस्टल तसेच पिस्टलचे ३० जिवंत काडतुस यांसह एक लाख ६२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे .
याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , शहादा शहरातील प्रेस मारुती मंदिरा जवळील दीनदयाल नगर मध्ये सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी भाडेतत्त्वावर राहतात . भगवान कोळी पाच दिवसांपासून रजेवर होते व ते बाहेरगावी गेले होते . भगवान कोळी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपल्या घरी परतले . त्यावेळी बाहेरूनच त्यांना स्वयंपाक घरातील लाईट सुरू असल्याचे दिसून आले . लाईट चालू राहून गेला असा संशय त्यांना आला . मात्र , मुख्य दरवाजा जवळ आल्यावर दरवाज्याचे कुलूप तोडल्याचे त्यांना दिसून आले . त्यांनी आत प्रवेश केला असता सर्वत्र घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्य त्यावरून त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले . यावेळी चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले एक लाख १२ हजार रुपये रोख व ५० हजार रुपये किमतीच्या दहा ग्रॅम वजनाची सोन्याचा तुकडा तसेच एक ९ एम . एम . शासकीय सर्विस पिस्टल बट – क्रमांक ३५ व तिचे ३० जिवंत काडतुसे असा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले . घटनेची माहिती मिळताच शहाद्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत , पोसई जितेंद्र पाटील आदींसह पथकाने घटनास्थळी भेट देऊन रात्री उशिरा पर्यंत ठसे तज्ञ व श्वानपथकाला प्राचारण करण्यात आले होते . दरम्यान अज्ञात चोरांन विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे करीत आहेत .
Users Today : 39