प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार तळोदा
अक्कलकुवा रस्त्यावर रामपूर फाट्या जवळ वाहनाने धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने वृद्धाचा मृत्यू तर एकास दुखापत झाल्याची घटना घडली .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , तळोदा तालुक्यातील रामपूर येथील प्रताप जेमू नाईक ( वय ६५ ) सव राजू नाईक हे अक्कलकुवा – तळोदा रस्त्याने जात होते . यावेळी एका चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून रामपूर फाट्याजवळ मागून प्रताप नाईक व राजू नाईक यांना धडक दिल्याने अपघात घडला . घडलेल्या अपघातात प्रताप नाईक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर राजू नाईक जखमी झाले . अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला . याबाबत निलेश दिलवरसिंग नाईक यांच्या फिर्यादी वरुन तळोदा पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३७ , ३३८ , मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास महिल सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत .
Users Today : 39