दुकानात पेट्रोल बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
 
शहादा तालुक्यातील सावखेडा व कर्जत येथील दोघांविरोधात ज्वालाग्रही पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा तालुक्यातील सावखेडा येथील रोहिदास जगन्नाथ मराठे यांनी टपरीत ८८० रुपये किंमतीचे ८ लिटर पेट्रोल सदृष्य द्रव्य बाळगतांना आढळून आले . तसेच शहादा तालुक्यातील कर्जत येथील पोशा तुकाराम सोनवणे यांनीही टपरीत १ हजार १०० रुपये किंमतीचे १० लिटर पेट्रोल सदृष्य द्रव्य बाळगतांना आढळून आले .
  याबाबत पोशि.दिनकर चव्हाण , पोशि . मिथून सिसोदे यांच्या फिर्यादी वरुन दोघांविरोधात शहादा पोलिस ठाण्यात भादंवि कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *