प्रशासनाच्या ढीसाळ नियोजनाचा ञास सर्वसामान्यांना त्रास
व्यापारी, उद्योजक, सेवा उद्योग, डॉक्टर, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी सर्व क्षेत्रातील नागरीकांमधुन प्रशासनाचे हलगर्जी पनावर असंतोष
आमदार ,खासदार,पालकमंत्री जनतेला या त्रासापासून न्याय देण्यास असर्मथ
पालकमंत्री कडे सहा जील्याचा कारभार, मात्र एका जिल्ह्यात पूर्णतः लक्ष देण्यात नियोजन शून्य
विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी अकोट
अकोला मार्गाला जोडणारा गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पुलाला मोठी भेग पडल्याने पुल पूर्णतः जीर्ण झाल्यामुळे या पुलाचे मार्गाने होणारी वाहतूक गेल्या महिनाभरा पासून ठप्प असल्याने तालुक्यावर होणारे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत.सर्वसमान्यांच्या दैनंदिन जीवन शैलीवर परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे.प्रशासनाच्या ढीसाळ नियोजनाचा ञास सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहे.लांबीच्या अंतरामुळे चोहोट्टा बाजार, दहीहंडा, गांधीग्राम, अकोट ,अकोला, तेल्हारा,येथील मुख्य बाजारपेठेवर व्यापारी वर्ग आणि ग्राहकांनी पाठ फिरवलेली असताना या परिसरातील सर्व क्षेत्रातील उद्योग व व्यापारास याचा फटका बसला आहे. जील्याना तसेच दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यामुळे पुर्ण अर्थकारण सध्या ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. बंद वाहतूकीचा फटका सर्व क्षेत्राना बसलेला आहे. व्यापारी, उद्योजक, सेवा उद्योग, डॉक्टर, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी सर्व क्षेत्रातील नागरीकांमधुन याबद्दल प्रचंड असंतोष आहे. तो सध्या निवेदनांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. प्रशासन कागद रंगवण्यात तर राज्यकर्ते केवळ आश्वासने देण्यात व्यस्त राहीले आहेत. राज्यकर्ते व प्रशासन केवळ आश्वासन देण्यात धन्यता मानत आहे, दुसरीकडे तालुक्यातील सर्व बाजारपेठेतील आवक तेजीच्या काळातही नगण्य आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने कुठलाच मार्गे उपलब्ध केलेला नसल्याने नागरीकांना वेळखाऊ मार्गाचा वापर करावा लागत आहे .
या समस्येवर शासनाने वेळीच उपाययोजना केल्या नसल्याने त्यामुळे त्याचे असंतोषाचे रुपांतर गांधीग्राम येथे सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनला आज पासून सुरुवात झाली.
या मध्ये आंदोलनातील मागण्या
१.गांधीग्राम वरून अकोट पर्यायी मार्गाचा वापर ताबडतोब चालू करावा.
२.जुन्या पुलाचे स्त्रॅक्चरऑडिट तसेच रोट्रॉफिटिंग करून पुलावरून हलकी वाहने चालू करण्यात यावी
३. गोपालखेड वरून नवीन पुल तयार असून समोरील पोच रस्ता करून वाहतून चालू करण्यात यावी
४. अकोट अकोला रेल्वे मार्गे गेल्या दोन वर्ष पासून बंद असून रेल्वे रस्ता ताबडतोब चालू करावा अशा प्रकारे आंदोलनातील मागण्या प्रशासन समोर मांडल्या आहेत.
यामध्ये उपस्थित नागरिकानी प्रशासनावर असणार रोष व्यक्त होणार आहे अनेक सामाजीक संघटना, संस्था अगदी व्यापाऱ्यांनीही स्थानीक पातळीवर आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत.
या आंदोलनात सहभागी .मनोहर शळके राजेश मंगळे. ग्रां. प.सरपंच गांधी ग्राम सौ. सुषमा ताई श.ठाकरे.सदस्य शरद ठाकरे,अतुल काठोले,सुभाष फुरसुले, पुरुषोत्तम शित्रे, डॉ पुरुषोत्तम दातकर,गणेशराव अढाउ,बंडू दोड,सुरेंद्र ओइंबे,सुधीर पेटे,केशव मोडक,नामदेव मोडक,भीमराव तायडे,संदीप पळसपागर,रामदास काठोळे,संजय मांजरे,सोमेश काठोळे,संतोष ठाकरे,संतोष कुकडे,अरविंद खंडारे,रतन दामोदर,दीपक खडारे.राजेंद्र ठाकरे,सोनू राठोड, तैसिन खा पठाण,,सुनिल फुरसुले,श्रीकृष्ण गावंडे,संजय काठोळे,रवी वसू,राहुल लावडे,निलेश बगाडे,मंगेश अं. ताडे,एकनाथ काळमेघे,किशोर तिवारी, तस्लिम शहा,श्रीकृष्ण बदरखे,पुरुषोत्तम गोंडचवर, दिलीप भाऊ लेलेकर मा उमेश खंडारे सुनिल भाऊ बांगर हर्षल कोल्हे पत्रकार विनोद वसु पत्रकार गणेश बुटे इतर गावकरी आणि आधी उपस्थित होते ::::::: यावेळी बाल मुकुंद भिरड माजी जिल्हाध्यक्ष वंचित यांनी यावेळी भेट दिली तसेच प्रदीप देशमुख त्यांनी सुद्धा या आंदोलनाला भेट दिली व आपल्या पाठिंबा दिला.
Users Today : 45