तळोदा येथे भगवान बिरसा मुंडा पूर्णाकृती पुतळ्याचे ग्रामविकास मंत्री ना . गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण….

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी‌ प्रविण चव्हाण नंदुरबार तळोदा
शहरातील बस स्थानक जवळील बिरसा मुंडा चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत बीरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ग्रामविकास मंत्री ना . गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले .  या वेळी खा.हिना गावित ,आ.शिरीष नाईक,आ.आमश्या पाडवी , आ . राजेश पाडवी , आ . काशिराम पावरा , जि.प.अध्यक्षा सुप्रिया गावित , नगराध्यक्ष अजय परदेशी , उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी , भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी , डॉ . शशिकांत वाणी , दीपक पाटील , शहर अध्यक्ष योगेश चौधरी आदी सह नगरसेवक , नगरसेविका व तालुक्यातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते .
  या वेळी ना.गिरीश महाजन म्हणाले की , आज बिरसा मुंडा यांची जयंती त्या निमित्ताने सर्व समाज बांधवांना शुभेच्छा . आदिवासी समाज हा अतिशय काटक समाज आहे . या साठी समाजातील मुलांना शोधून संधी दिली पाहिजे . त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना संधी मिळेल तळोदा शहरातील क्रीडा संकुलाचा प्रश्न प्रबलित आहे . त्या साठी जो निधी लागेल तो लगेच दिला जाईल . बिरसा मुंडा यांचा पुतळा या ठिकाणी आहे तो बघून आपणा सर्वांना प्रेरना मिळेल आमदार राजेश पाडवी यांचे कार्य महान आहे असे सांगितले .या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांनी संवाद साधतांना जळगाव जिल्ह्यातील दूध संघ संदर्भात प्रश्न उपस्थित केले . या वेळी ते म्हणाले की जळगाव दूध संघात मोठा घोटाळा झाला आहे येथील एम . डी . संबंधित एम . डी . यांनी कबूल केले आहे की , येथील माल गायब आहे . या ठिकाणी कोट्यावधींची अफरातफर असून त्या संदर्भात तपास सुरू आहे असे सांगत 450 रुपये किलोचे तूप 85 रुपये भावाने विकले गेले आहे . हेही त्यांनी मान्य केले या प्रकरणी चौकशी सुरू आहे . तेथील कर्मचाऱ्यांना अटक केली . हा कुठलाही राजकीय दबाव नाही आमदार खडसे हे सर्वच पदे आपल्या घरात पाहिजे अस समजतात असा घणाघाती आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश मराठे यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष विनोद माळी यांनी मानले .
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *