औरंगाबाद येथे नोकारानेच चोरले अकरा तोळे सोने 

Khozmaster
3 Min Read
जिन्सी पोलिसांची धडाकेबाज कारवाई आरोपी केला जेरबंद
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
औरंगाबाद येथील मालकाच्या घरातील नोकराने चोरलेल्या अंदाजे ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जिन्सी पोलीसांनी नोकरास अटक करून शिताफिने केले हस्तगत, फिर्यादी नामे संतराम कोंडीबा वाळके व ५९ वर्ष पेदा व्यापार रानिव्वेश्वर कॉलनी, साखरे मंगल कार्यालयाजवळ औरंगाबाद यांनी फिर्याद दिली की, आमच्या कपाटात ठेवलेले सुनेचे सोन्याचे दागीने दिसून आले नाही व आमच्या घरात कोणीही दिवाळी नंतर आलेले नाही पण माझे कार क्रमांक एम.एच. २०. सौ. एस. ६६१६ चालविण्याकरीता ठेवलेला ड्राईव्हर हा मागील चार वर्षे पासून नोकरीवर ठेवल्यापासून घरात येत जात होता. त्याचे नाव पुंडलिक मुळे, रा. विजयनगर गारखेडा औरंगाबाद असे असून त्यानेच आमच्या घरातील सोन्या चांदिचे दागीने चोरी केल्याचा माझा संशय आहे. माझे घरातून चोरीस गेलेल्या सोन्याचे व चांदीचे वर्णन खालील प्रमाणे आहे. २) सोन्याचे ८ तोळ्याचे नेकलेस २) सोन्याचे ७ तोळ्याचं गजरी हार ३) सोन्याचे ३ तोळ्याचे मंगळसूत्र ४) सोन्याचे २ नग सोन्याचे ८ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या ५) सोन्याची १ तोळ्याची चैन ६) सोन्याचे पैडल अर्धा ग्राम वजनाचे ७) किमतीची चांदिची चाळ १० भार वजनाची ८) २ ग्राम सोन्याची अंगठी १) चांदीचे पायातील व हातातील प्रत्येकी एक-एक कडे असा एकूण अंदाने. १०,०४,४००/- रुपये किंमतीचे वर्णनाचा व किंमतीचा सोने व चांदीचा मुद्देमाल माझा नौकर पुंडलिक मुळे यानेच स्वतःच्या फायद्या करीता लबाडीने आमची नजर चुकवुन घरातील माल चोरुन नेला असावा असा माझा दाट संशय आहे. अशा दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. जिन्सी येथे गुरनं. ३१३/२०२२ कलम ३८१ भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा दाखल होताच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. व्हि. एम. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल. बी. मगरे,शेख गनी, आधाडे, शेख जफर,ए.डी.खान, नंदू चव्हाण, शंकपाळ,बमनात यांनी संशयित आरोपी पुंडलिक मारोती मुळे वय 33 वर्षे, रा. विजयनगर औरंगाबाद याचा शोध घेऊन त्यास शिताफिने अटक केली. मा. न्यायलायाने त्यास दिनांक 17/11/2022 रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने. १) सोन्याचे ८ तोळ्याचे नेकलेस २) सोन्याचे ७. तोळ्याचं गजरी हार ३) सोन्याचे २ तोळ्याचे मंगळसूत्र ४) २ नग ८ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या ५) सोन्याची १ तोळ्याची चैन ६) सोन्याचे पेंडल अर्धा ग्राम वजनाचे ७) २ ग्राम सोन्याची अंगठी असे एकूण १९ तोळयाचे सोन्याचे दागिने असा चोरीस गेलेल्या एकुण दहा लाख रुपयाच्या दागीण्यापैकी साडे नऊ लाख रूपये वरील वर्णनाचे व किंमतीच सोन्याचे दागिने काढून दिल्याने हस्तगत केले आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, डॉ. निखील गुप्ता साहेब, मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 श्री. शिलवंत नांदेडकर साहेब, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त निशीकांत भुजबळ साहेब, श्री. व्यंकट माधव केंद्रे पोलीस निरीक्षक पो.स्टे. जिन्सी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल. बी. मगरे, पोह१७८७ शेख गनी, पोह५४५ आघाडे, पोना/२५ शेख जफर, पोना ३६६ ए.डी. खान पो.ना. १४४६ नंदू चव्हाण, पो. अं./ २८१८ शंकपाळ, पो. अं. २६४९ बमनात यांनी केली. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि.श्री. ए.बी. मगरे हे करीत आहेत.
0 9 4 7 7 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *