एक चिंतनाचा लाभ घ्यावा;जयप्रकाश चव्हाण यांचे आवाहन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
गोद्री, तालुका जामनेर जिल्हा जळगांव येथे २५ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत “अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लभाना- नायकडा समाज कुंभचे” आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्या समाजात जेंव्हा जेंव्हा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तेंव्हा समाजातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतात. या कार्यक्रमाबद्दलही समाज माध्यमातून पुढे येत आहेत.या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशे आवाहन भाजपा जिल्हा उपध्याक्ष जयप्रकाश चव्हाण यांनी केले आहे. बहुतांश प्रतिक्रिया या अपूर्ण महितीच्या आधारेच येत आहेत. जसे की- पोहरादेवी येथील महंतांना विचारले नाही, गोर धाटी संस्कृती नष्ट होणार आहे, पोहरादेवीचे अस्तित्व नष्ट करण्याचे षडयंत्र आहे, पोहरादेवीला कार्यक्रम का घेतला नाही ? यांना का विचारले नाही, त्यांना का विचारले नाही, अमुक मंत्र्याला का विचारले नाही. या कुंभमुळे समाजाचे कोणते प्रश्न सुटणार आहेत ? या कार्यक्रमाला मदत करण्यामागे आरएसएसचा हेतु काय ? कुंभ काय आपली संस्कृती आहे काय ? असे अनेक प्रश्न विचारले जाणार आहे या अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना – नायकडा समाज कुंभ २०२३ मध्ये २५ ते ३० जानेवारी गोद्री ता जायन येथे चाळीस एक्कर शेतात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली आहे. या मुंबईत बैठकीत मंत्री संजय राठोड, गिरीश महाजन, उपस्थित होते.या कार्यक्रमाला देशभरातून येणारे अतिथी, संत,भाविक भक्त यांची गैरसोय होऊ नये म्हणून वीज,रस्ते, पाणी, वैद्यकीय सुविधा व सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची अतिथी यांची गैरसोय होणार नाही. हा कुंभ चांगल्या पद्धतीने पार पडेल याची खात्री प्रशासनाने घ्यावी अशे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सर्व पदाधिकारी यानां दिले आहे अशी माहिती भाजपा जिल्हा उपध्याक्ष जयप्रकाश चव्हाण यांनी जेष्ठ पत्रकार गोकुलसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.
Users Today : 14