यंदा युवा वर्गात मोठा उत्साह ; तालुक्यातील ४५ ग्रामपंचायत रंगणार रणसंग्राम..

Khozmaster
3 Min Read
रिसोड तालुक्यात आता इलेक्शन फिव्हर’..!!
दिपक मापारी, रिसोड
 तालुक्यात ४५ ग्रामपंचायत च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महिना अखेरीस इलेक्शनची रणधुमाळी दिसेल. यंदाच्या निवडणुकीत युवा वर्गात सरपंच पदाचे आकर्षण जास्त दिसून येत असून, स्पर्धा जोर धरत आहे. गावच्या विकासाचे मॉडेल कोण बांधणार असा सवाल, जाणकार उपस्थित करीत आहेत. ऐन थंडीच्या दिवसात इलेक्शन फिव्हर चढत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये रिसोड तालुक्यांमध्ये ४५ ग्रामपंचायतीचा बिगुल वाजल्याने आता येत्या 28 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची  प्रक्रिया सुरुवात होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर 18 ला या ग्रामपंचायतचे मतदान होणार आहे. निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी मतदान होणार असल्याने गाव गावात चुरस पहावयास मिळणार आहे. थंडीच्या दिवसात इलेक्शन फिव्हर सुरुवात होणार असून, प्रचार मात्र कडक अन्न उबदार मेजवानीने अधिक रंगत वाढणार आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा वर्गात मोठा उत्साह दिसून येत आहे. आत्तापासून सोशल मीडियावर फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सह, इतर माध्यमातून भावी नेता, आमचे सरपंच’गावचे भाग्यविधाते’लोकनेते अशा नाना विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. आपल्यालाच निवडून द्या, गावचा नकाशाच बदलून टाकू’अशा पोस्ट शेअर होत असल्या तरी आता घोडा मैदान आमने सामने अशा पोस्ट शेअर करीत सोशल मीडियावर चांगलीच करमणूक होत आहे. अनेक गावात वीज रस्ते यासह अनेक समस्या आहेत. अशा प्रश्नाकडे निवडणुकीत लक्ष जावे आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराने ते काम पूर्ण करावे. अशा आणाभाका प्रचार दरम्यान घेण्यात येतील. राज्यात एवढा मोठा राजकीय भूकंप झाल्यानंतर आता तालुक्यात सर्वाधिक ४५ ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याची पहिलीच वेळ आहे. आता प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकावर शाब्दिक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळणार आहे..
गावागावात आश्वासनांची खैरात..
सोशल मीडियात वार रंग घरत असल्याने आता भावी उमेदवार मतदारराजाचे उंबरठे झिजवत आहे. निवडणुकीमुळे गावागावात भावी उमेदवार आश्वासनाची खैरात वाटायला सुरुवात केली असून, मतदाराची मनधरणी करायला सुरुवात केली आहे. तर सत्ताधारी आणि विरोधकाकडे मातब्बर इच्छुकाची संख्या जास्त आहे. तर मागील निवडणुकीच्या पराभवाची परतफेड करण्याचा चंग विरोधकांनी बांधला असून, सत्ताधाऱ्याकडून पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत दिवसेंदिवस वाढत आहे..
गावच्या पारावर चर्चा..
सध्या कडाक्याच्या गुलाबी थंडीत ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की आघाडी तयार होण्यापासून मतदान होईल पर्यंत वेगवेगळ्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असते.कोण म्हणतं काय केलं या सरपंचाने’ अभि येतो नया हैं पर जमता है ‘ तर दुसरा म्हणतो जाऊ द्या ना कोरोनाच्या काळात नातेवाईकांना क्वारंटाईन करून खूप डोक्याला ताप दिला त्या सरपंचाने’ चौथा म्हणतो’ त्यात काय त्यांनी बरोबरच केले ना, त्यामुळे आपले गाव सुरक्षित राहिले, अशा विविध रंगतदार चर्चा सध्या गुलाबी थंडीत ओट्यावर चहा टपऱ्यावर पानठेले, पाराच्या ओट्यावर निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगत आहे..
0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *