श्री सद्गुरु किसनदेव गुरू हैनाही महाराज संस्थान, एकलरा ” ब ” वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा

Khozmaster
2 Min Read
आ .सौ .श्वेता ताई महाले यांच्या प्रयत्नांना यश
चिखली  तालुक्यातील प्रसिध्द असेलेले आणि तालुक्यातील सर्वांची प्रचंड श्रद्धा असणारे एकलरा येथील श्री सद्गुरु किसनदेव गुरू हैनाही महाराज संस्थान, एकलरा या तीर्थे क्षेत्राला राज्य सरकार चा ” ब ” वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला असल्याने या क वर्ग असणाऱ्या तीर्थ क्षेत्राला ब वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
 महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: तीर्थयि-२०२२/प्र.क्र.६३/यो-६ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ फोर्ट, मुंबई ४०० ००१ दिनांक : १० नोव्हेंबर, २०२२ याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला असून या तीर्थ क्षेत्र विकासासाठी आता निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.श्री सद्गुरु किसनदेव गुरू हैनाही महाराज संस्थान, एकलरा या तीर्थे क्षेत्रासोबतच , वियोगी महाराज संस्थान, उमाळी ता. मलकापूर या तीर्थ क्षेत्राला सुद्धा ” ब “वर्ग दर्जा मिळाला आहे.
ब ” वर्ग तीर्थ क्षेत्राची तब्बल तीन वर्षे मीटिंग न झाल्याने रखडली होती मान्यता
महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात राज्यभरातून अनेक ” क ” वर्ग तीर्थ स्थळांचे ” ब ” वर्ग तिर्थ स्थळात श्रेणी वाढ प्रस्ताव आलेले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे तीन वर्षांमध्ये एकही मीटिंग न झाल्याने ” ब “वर्ग तीर्थक्षेत्राच्या प्रस्तावांना मान्यता मिळालेली नव्हती. यासाठी आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. प्रत्येक विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न,  लक्षवेधी , कपात सूचना या माध्यमातून सुद्धा सरकारचे  लक्ष वेधले होते. परंतू कुंभकर्णी झोपेत असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला काही जाग आली नव्हती.
परंतु राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार सत्तारूढ होताच महाविकास आघाडीच्या कार्यकाळात रखडलेल्या सर्वच कामांना मान्यता देण्यासाठी सकारात्मक झाले त्याच अनुषंगाने ” ब “तीर्थक्षेत्राची नोव्हेंबर 2022 रोजी राज्यस्तरीय मीटिंग होऊन सदर मीटिंगमध्ये एकलारा येथील *श्री सद्गुरु किसनदेव गुरू हैनाही महाराज संस्थानला ” ब ” वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा* देन्यात आला आहे.
0 9 4 6 7 9
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *