नरेंद्र मोदी सर्वात जास्त खोट बोलणारे पंतप्रधान

Khozmaster
4 Min Read
लक्ष्मणराव वडले याचा आरोप.
चिखली (प्रतिनिधी) स्वातंत्र्या नतंर जेवढे पंतप्रधान झाले त्या मध्ये सर्वात जास्त खोट बोलणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा नंबर लागतो.सत्तेवर येण्या पूर्वी शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न करण्याची घोषणा केली ती पूर्ण केली नाही तर या उलट ते सत्तेवर आल्या पासून शेतकऱ्यांची अवस्था गंभीर झाली आहे, खताचे भाव वाढले आहे,कीटकनाशकाचे भाव वाढले आहे,गॅसचे भाव वाढलेआहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदीने अच्छे दिन येण्याच्या देशवासियांना थापा दिल्या असा आरोप शिवसेनेचे उपनेते तथा शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी देऊळगाव धनगर येथे केला.युगात्मा शरद जोशी यांच्या ८८व्या जयंती निमित्त शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हा मेळाव्यामध्ये आपले विचार व्यक्त करताना ते बोलत होते .
          यावेळी मंचकावर मुळे
   अण्णा फाऊंडेशनचे रमेश अण्णा मुळे ,हवामान अभ्यासक पंजाबराव डग  , विदर्भराज्य अंदोलन समितीचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर,स्वभाप उपाध्यक्ष समाधान कणखर, स्वभाप जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, पंचायत समिती सदस्या उषाताई थुट्टेपाटील, दुर्गाबाई घुबे, शिवप्रसाद सारड,डिगाबंर
चिंचोले, तेजराव मुढे,रमाकांत महाले,अंकुशराव जाधव,पांडुरंग भुतेकर इत्यादि  उपस्थित होते.
            आपल्या भाषणात पुढे बोलताना त्यांनी आपल्या चळवळीतील आठवणीला उजाळा देत ते म्हणाले आपण १९८२ मध्ये शरद जोशींच्या विचाराने भारावून शेतकरी संघटनेचे काम सुरू केले आपण ३५ वर्ष संघटनेचे काम केले. शरद जोशींच्या विचाराने आम्ही माजंरीचे वाघ बनलो.आपल्यावर ८८ पोलीस केस आपण २२ दिवाळयाला घराबाहेर होतो तर १० दिवाळी सणाला जेल मध्ये होतो शेतकरी जगला पाहिजे म्हणून धडपड करीत होतो,चळवळीत आपले आर्थिक नुकसान खूप झाले पण मी शेतकऱ्यांवर उपकार केले नाही तर मला आत्मिक समाधान मिळत होते. मला नेहमी एकच गोष्ट सतावत असते आमचा बाप जगाचा पोशिंदा असताना मुलीचे लग्न केले की तो कर्जात का डुबतो?आमची भीक वाढणाऱ्या ची औलाद आहे , सुर्या चंद्राला ग्रहण लागले तर त्यांचे संकट दूर व्हावे म्हणून दान करणारे आम्ही शेतकरी. तर आमच्यावरच दारिद्री का?या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सर्व शेतकरी एकत्र या.आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील .लहान लहान माणसे एकत्र येऊन स्वतंत्र उभं रहात असत, शिवरायांनी आठरा पगड जातीचे युवक एकत्र करून स्वतंत्र मिळवलं होत हे विसरून चालणार नाही मोठे मोठे सरदार दिल्ली,विजापूरच्या दरबारात होते तरीही मूठभर मावळ्यांच्या भरवशावर शिवरायांने स्वराज्य उभं केलं. त्यामुळे काळजी करू नका तर काम करीत रहा.
शरद जोशींचे विचार भरोसा आणि देऊळगाव धनगर या गावांना अंगिकारले आहे या गावातील लोक स्वाभिमानाने जीवन जगत आहे लाचारीने जगणे शरद जोशींच्या कार्यकर्त्याना मान्य नाही. आपण  शिवसेनेत प्रवेश केला पण आपण  लाल बिल्ला छातीवर लावणारा शेतकरी संघटनेचा एकही कार्यकर्ता शिवसेनेत नेणार नाही असे ठेवलेले आहे कारण आपण शेतकरी संघटना खिळखिळी करण्याचे पाप आपण आपल्या माथी मारून घेणार नाही कारण चळवळ टिकली पाहिजे तरच शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईल.असे स्पष्ट मत लक्ष्मणराव वडले यांनी व्यक्त केले. हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पावसाच्या अंदाजाच्या तारखा सांगितल्या तर मुळेअण्णा सोशल फाऊंडेशनचे प्रवर्तक रमेश मुळे यांनी आपल्या कार्याची माहिती देत, असाध्य रोगाने पीडित लोकांना आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा शब्द दिला .
   या कार्यक्रमाचे संचालन कृषी योद्धाशेतकरी संघटनेचे  ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी केले तर आभार माजी पंचायतसमिती उपसभापती भानुदास घुबे यांनी केले गावकऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
0 8 9 4 5 7
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *