श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराचा विकास हाच माझा श्वास – शिवभक्त रंगनाथ महाराज….

Khozmaster
2 Min Read
पहूर येथे पोलीस , सैन्य दलाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मैदानाचे भूमिपूजन 
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील: देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव  मंदिराच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहील , मंदिर परिसराचा विकास हाच माझा श्वास असल्याचे प्रतिपादन काल दि.१७/११/२२ गुरुवार रोजी आजन्म भिक्षा झोळी संकल्पक श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केले . हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे  यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे पोलीस दल , सैन्य दलाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते .
 येणाऱ्या काळात मेगा पोलीस भरती होणार असून मोठ्या संख्येने तरुण – विद्यार्थी भरतीची तयारी करत आहेत . श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट  तर्फे विद्यार्थ्यांना भरतीचा सराव करण्यासाठी नि:शुल्क  मैदान उपलब्ध होणार असून आज सकाळी भूमिपूजन करण्यात आले .
श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे विकास तसेच मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी मंदिराचे पुजारी व ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी विजयादशमीपासून जन्मदिवसाच्या झोळीचा संकल्प केला आहे . या भिक्षा झोळी द्वारे मिळालेल्या निधीतून सदर मैदानाचे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले .गावातील आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ,असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले . यावेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , पहूर पेठचे उपसरपंच श्याम सावळे , किशोर बनकर , मा . नगरसेवक शेंदुर्णी श्रीकृष्ण चौधरी , ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव ,   ईश्वर हिवाळे ,आकाश  बनकर , पत्रकार प्रविण  कुमावत , प्रभाकर लहासे , किशोर लोहार ,   गजानन सोनार , यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन व आभार शंकर भामेरे यांनी मानले .  श्री क्षेत्र संगमेश्वर  महादेव मंदिर  ट्रस्टच्या  या निर्णयाचे स्वागत होत आहे .
0 9 4 7 7 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *