क्रांती चौक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
औरंगाबाद येथे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील लॉजवर थांवलेल्या कापड व्यापायाला पिस्तुलाचा धाक दाखवून दोन सराईत गुन्हेगारांनी लुटले. ही घटना १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास जनता लॉज येथे घटना याप्रकरणी लूटमार करणाऱ्या दोन्ही सराईत गुन्हेगारांना क्रांती चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शेख नजीर शेख शफिक वय ३०.रा. असेफिया कॉलनी, गल्ली क्र १९. टाऊन हॉल आणि मोहम्मद आमेर सलीम खान (३१, रा. अन्वर मस्जिदजवळ कसंबरी दर्गा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी पिस्तूल आणि लुटलेला मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी सांगितले.विशाल विजकुमार भाटीया वय ३०, रा. गुरुदासपुर, पंजाब) हे मध्यवर्ती बसस्थानकासमोरील जनता लॉज येथे थांबले होते. १६ नोव्हेंबरच्या रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या रुमचा दरवाजा बाहेरुन चार पाच वेळेस कोणीतरी वाजवला. भाटिया यांनी दरवाजा उघडला. तेव्हा दोघेजण उभे दिसले. त्यातील एकाच्या हातात पिस्तूल होते. त्यातील एकाने भाटिया याना तोंडावर बुक्का मारला. ‘तू आवाज मत कर तेरे को यही मार देगे, तू निचे बैठ जा’ असे धमकावले. भाटिया यांच्या हातातील दोन चांदीच्या अंगठ्या, कडे, चार हजार रोख, दोन मोबाईल असा ऐवन हिसकावला. लोक जमा होताच दोघेही तेथून पसार झाले. त्यावरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, विशेष पथकाचे सहायक निरीक्षक विशाल इंगळे उपनिरीक्षक विकास खटके, जमादार संतोष मुदीराज, इरफान खान, संतोष सूर्यवंशी, भावलाल चव्हाण, मस्जीद पटेल यांनी आरोपींचा शोध घेऊन नजीर आणि मोहम्मद या दोघांना टेक्सटाईल मिल परिसरात छापा मारून अटक केली. शेख नजीर याच्या अंगझडतीत कंबरेला खोचलेला लोखंडी गावठी कट्टा (पिस्तूल), चांदीचे कडे आणि मोहम्मद यांच्या अंगझडतीत दोन मोबाईल, ४५० रुपये रोख जप्त केले.
Users Today : 14