सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील मोलखेडा, हिवरी येथे सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधान्याची निर्मिती करण्यात आली. या वनराई बंधारा निर्मितीसाठी कृषी पर्यवेक्षक अतुल पाटील, कृषी सहाय्यक अर्जुन सुरडकर,स्वानंद पाटील यांनी स्वतः परिश्रम केले.या वनराई बंधाऱ्याच्या पासून शेतकऱ्यांना व जनावरांना याचा लाभ होईल अशे कृषी सहाय्यक मानसिंग भोळे यांनी यावेळी सांगितले.
तसेच याप्रसंगी प्रगतशील शेतकरी रामभाऊ वारंगणे, डिंगाबर पाटील, अमोल शेळके, अतुल इंगळे, गणेश शिनगारे,अभिमान पाटील, संग्रामसिंग पाटील, विजय वारंगणे, भूषण पवार, मख सर यांनी वनराई बंधारे निर्मितीसाठी सहकार्य केले.
Users Today : 14