सोयगाव निरज बिदे
सावावळदबारा परिसरातील थकीत वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. औरंगाबाद परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, कृषिपंप, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे व इतर अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे ५ हजार ३७७ कोटींचे वीजबिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.
वीजबिलांच्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही, असे निरज बिदे उटकार्यकारी अभियंता सोयगाव यांनी म्हटले आहे.ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे. त्यामुळे सोयगाव, सावळदबारा, मोलखेडा, घाणेगांव तांडा, डाभा, टिटवी, देव्हारी, जामठी, जरंडी, बनोटी, फर्दापूर सह थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून त्वरित सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने उपकार्यकारी निरज बिदे व सहाय्यक अभियंता योगेश जाधव यांनी केले आहे.
Users Today : 14