शेतकऱ्यांना कृ.उ.बा. समीतीत उमेदवारी सोबत मतदानाचा अधिकार हवा….

Khozmaster
1 Min Read
 महीला शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व वाढवावे
   विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना
बुधवारला झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील सरकारने कृषी उत्पन्न बाजार समीत्या मध्ये तात्काळ प्रभावाने अध्यादेश काढुन निवडणूका घोषित झालेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समीत्यात दहा गुंठे शेत जमीन आसणार्या राज्यातील शेतकऱ्यांना  उमेदवारीचा मार्ग मोकळा केला.  परंतु सरकारने कालच्या निर्णयातही शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवलेले आहे. यामुळे प्रश्न अधिक जटील होणार आसुन  राज्यातील सातबरा धारक सर्व शेतकऱ्यांना उमेदवारी सोबत मतदानाचा अधिकार मिळणे आपेक्षीत होते. राज्यातील सर्वच सातबारा धारक शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळावा व महीला शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व कृषी उत्पन्न बाजार समितीत वाढवण्या संदर्भात राज्याचे उपमुख्य मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून पत्र देण्यात आले आहे. पत्रामधे जो पर्यंत सातबारा धारक शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हातात राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समीत्यांचे सुत्र येणार नाही व पारदर्शकताही येणार नाही. राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समीत्या भ्रष्टाचाराने पोखरून टाकल्या आहेत. शेतकरी हीताला हारताळ फासुन पोटभरू लीडर लोकांची कुरणे बनल्या आहेत. धोरणात्मक आणि अमुलाग्र बदल केल्या शिवाय सुधारना होणार नसल्याची प्रतीक्रीया भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली आहे.
0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *