प्रतिनिधी प्रविण चव्हाण
तालुक्यातील काळंबा येथे शेती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन हाताबुक्यांनी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार तालुक्यातील काळंबा येथील नथ्थू डोंगऱ्या चौरे यांच्या मालकीची शेती राजू शिवराम भोये यांनी मागितली . नथ्थू चौरे यांनी शेती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन राजू शिवराम भोये , रामसिंग शिवराम भोये व कैलास रामसिंग भोये यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली रामसिंग.्सिंग भोये याने कुऱ्हाडीने दांनड्याने खांद्यावर , हातावर मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली . याबाबत नथ्थू चौरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोना . मुकेश ठाकरे करीत आहेत .
Users Today : 37