काटवनपाडा येथे वनविभागाने केले सागवानी लाकूड जप्त.

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
नवापूर तालुक्यातील काटवनपाडा येथे मकीच्या भुशाखाली लपविण्यात आलेले ३० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड वनविभागाने जप्त केले आहे .आज दि . १७ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक व नवापूर वनक्षेत्र स्टाफसह शासकीय वाहनाने काटवनपाडा येथे जाऊन रस्त्या लगतच्या महसूल क्षेत्रात फिरून पाहणी केली असता मकीच्या भुश्याखाली लपवलेले साग चौपाट मिळून आले . साग चौपाट नग जप्त करून विक्री आगार नवापूर येथे आणून पावतीने जमा करण्यात आले आहे .
  जप्त माल साग चौपाट नग ०७ घन मीटर ०.३१० असून त्याची बाजार भावानुसार अंदाजित किंमत २० ते ३० हजार एवढी आहे . सदर कारवाई वनसंरक्षक दि.वा. पगार , सहाय्यक वनसंरक्षक कृष्णा भवर , धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल , वनपाल भिवाजी दराडे , ए . एम . शेख , सुनीता पाटील , वनरक्षक कल्पेश अहिरे , संतोष गायकवाड , कमलेश वसावे , अनिल वळवी , अमोल गावित , गिरीश वळवी , उदयसिंग पाडवी , दीपाली पाटील , पिंकी बडगुजर , संगीता खैरनार , वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली .
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *