संघटित असल्यावरच समाजाच्या विकास; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

Khozmaster
1 Min Read
पालिकेच्या संत सेना भवनाचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती
 प्रविण चव्हाण नंदुरबार
संघटित असल्यावरच समाजाच्या विकास होत असतो त्यामुळे समाज संघटनेवर भर द्या. जोपर्यंत समाज संघटित होत नाही तोपर्यंत विकासाच होणार नाही असे मत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले.
नंदुरबार शहरातील नर्मदा विकास विभागाच्या कार्यालय परिसरात नगरपरिषदेच्या वतीने बांधून देण्यात आलेल्या श्री संत सेना महाराज भवनाचे उद्घाटन माजी आ.रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील.श्री संत सेना महाराज भवनाचा उपयोग समाजाच्या कार्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक दीपक दिघे, नगरसेवक रवींद्र पवार,नगरसेवक जगन्नाथ माळी, माजी नगरसेवक किशोर सोनवणे, अविनाश माळी,मोहित राजपूत,नाभिक पंचमढी राज्याध्यक्ष नाना शिरसाठ, शहराध्यक्ष दिलीप बोरसे, दुकानदार अध्यक्ष धनराज वरसाळे,शहर उपाध्यक्ष छोटू अहिरे, सचिव सुनील वरसाळे,नारायण शिरसाठ,दत्तात्रय सूर्यवंशी,दीपक शिंदे,जयेश वरसाळे, जिल्हाध्यक्ष किशोर हिरे, प्रकाश सैंदाणे, कुंदा सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री सैंदाणे,शहर अध्यक्ष मनीषा धनराज,विमल मंडलिक यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *