ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषिपंपाची वीज सतत खंडित; शेतकरी संकटात! ,

Khozmaster
3 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत 
परतीच्या पावसामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पाण्यात गेला, आता रब्बी हंगामात मोठी आशा होती. मात्र, महावितरणच्या सुलतानी धोरणांमुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामंही धोक्यात जाण्याची शक्यता आहे.
ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषीपंपाची वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने मोलखेडा येथील शेतकऱ्यांवर मोठं संकट निर्माण झाले आहे.
सोयगाव तालुक्यातील मोलखेडा, हिवरी, घाणेगांव तांडा, नादांतांडा  परिसरात खरिप हंगामा पाठोपाठ रब्बी हंगामही सावळदबारा महावितरणकडून केल्या जाणार्‍या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे संकटात सापडला आहे. विहिरीत पाणी असूनही विजेच्या लपंडावाने पिकांना ते देता येत नसल्याने नैसर्गिक आपत्तीनंतर ३३ केव्ही उपकेंद्र महावितरण सावळदबारा निर्मित आपत्ती शेतकर्‍यांवर ओढवली असल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.शेती क्षेत्रावर सध्या नेहमीच संकटे येण्याचा सिलसिला सुरू आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानामुळे शेतीपिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. गेल्या वर्षी उन्हाळ हंगामात पाणी पातळी घटल्याने पिके जळून गेली होती. त्यानंतर गेल्या खरीप हंगामात पिके काढणीस आली आसतानाच अतिवृष्टीने ती वाहून गेली. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यानंतर रब्बी हंगाम उभा करण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागली. रब्बी पिकांची कशीबशी लागवड केली मात्र ढगाळ हवामानामुळे कीटकनाशकांची फवारणी करीत कशबशी पिके जगविण्याचा अटापिटा सध्या सुरू आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे.मोठ्या प्रयत्नाने वातावरणावर मात करीत शेतकरी पिकांचे स्वास्थ्य टिकविण्याचा प्रयत्न करीत असले तरी सावळदबारा महावितरणच्या लहरी वीज पुरवठ्यामुळे पिकांची धूळधाण होऊ पाहत आहे. शेतीसाठी दिला जाणारा वीजपुरवठा तीन टप्प्यांत असला तरी दोन टप्पे ऐन थंडीच्या वेळेतच आहेत. एक टप्पा दिवसाचा असला तरी वेळोवेळी वीज खंडित होत असल्याने पिकांचे भरणे होत नाही. त्यामुळे यंदा मुबलक पाणी उपलब्ध असूनही विजेच्या लहरीपणाचा फटका शेती पिकांना बसत आहे. – : रवींद्र गायकवाड शेतकरी मोलखेडा ता सोयगाव.शेतकऱ्यांवर आलेल्या या अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता सावळदबारा  महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात आलाय. गहू, हरभरा कसा पेरायचा? कुटुंब जगवायचं कसं? लेकराबाळांचं पोट कसं भरायचं? की आत्महत्या करायची? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केलाय.- :
जेष्ठ नागरिक रामभाऊ वारांगणे मोलखेडा शेतकरी
शेतीसाठी यंदा मुबलक पाणी आहे. गेल्या दोन हंगामांत शेतकर्‍यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. चांगले पाणी उपलब्ध झाल्याने या रब्बी हंगामात गेल्या दोन हंगामांत झालेल्या नुकसानीची कसर भरुन काढता येईल आशी शेतकर्‍यांची अपेक्षा होती. मात्र विजेचे भारनियमन व सातत्याने शेतीसाठी मिळणार्‍या वेळेतील विजेचा लपंडाव यामुळे शेती पिकांचे भरणेच होत नसल्याने पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करून शेतकर्‍यांना आधार द्यावा. – : अतुल इंगळे शेतकरी मोलखेडा
0 9 4 7 7 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *