गोंदेगाव येथ चोरी झालेली रक्कम मिळाली परत.

KHOZ MASTER
1 Min Read
सोयगाव पोलीस स्टेशन दबंग कामगिरी.
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
तालुक्यातील गोंदेगाव येथे     दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी गोंदेगाव येथील किराणा व्यावसायिक अविनाश लक्ष्मण पाखले यांच्या राहत्या घरातील किराणा दुकानात चोरी झाली होती.पाखले यांनी बनोटी बिटला  अर्ज केल्यानंतर तपासाची चक्र फिरवण्यात आली व विशाल राजेंद्र भोसले उर्फ बंटी यात दोषी आढळून आला. त्याकडून रोख रक्कम रुपये अठरा हजार दोनशे मुद्देमाल तपास अधिकारी राजू निवृत्ती बरडे यांनी जप्त केला. व सपोनि अनमोल केदार पोलीस स्टेशन सोयगाव येथे सुपूर्द केला आज दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी कार्यालयीन पूर्तता करून गोंदेगाव येथील व्यापारी अविनाश पाखले  यांना अठरा हजार दोनशे रुपये ठाणे पोलीस सहाय्यक निरीक्षक  अनमोल केदार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.यावेळी पोलीस कर्मचारी  पाईकराव  व तपास अधिकारी राजू निवृत्त बरडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.व्यापारी अविनाश पाखले यांनी सोयगाव पोलीस स्टेशनचे व  सर्वांचे याप्रसंगी आभार व्यक्त केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *