लोटा बहादारांची संख्या वाढली
कोणतेही पथक नसल्याचा परिणाम;प्रा.जीवन कोलते
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव,जागतिक शैचालय दिन ग्रामीण भागामध्ये शौच्छालय असुन सुद्धा वापर न करता लोक उघड्यावर बसत आहेत.तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावा-गावानी शौच्छालय बांधलेले आहेत.माञ याचा लोक उपयोग करत नसल्याचे पाहायला मिळत आहे.एकप्रकारे शौच्छालयाचे तिनतेराच वाजले आहेत.सोयगाव तालुक्यामध्ये कोणतेही पथक सक्रिय नसल्याने उघड्यावर बसणार्यांच्या संख्येत आधिकच वाढ होताना दिसत आहे. ज्यांनी संडास बांधले आहे.आसे लोक उघड्यावर शौच्छास जात आहेत.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अभियाना अतंर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरीकांना शौच्छालय उभारणीसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला आहे.माञ या शौच्छालयाचा वापर न करता लाभार्थी ग्रामस्थ उघड्यावरच उघड्यावरच शौच्छास जात आसल्याने या स्वच्छता आभियानाचा गावोगाव केवळ फज्जा उडाला आहे.प्रत्येक गावात प्रशासनाकडुन देण्यात आलेल्या उदिष्टांची पुर्ती तर ग्रामपंचायत कडुन झाली.माञ अधिकार्याकडुन व कर्मचार्याकडुन ग्रामस्थांमध्ये जनजागृती न झाल्याने अनेक नागरीकांमध्ये अद्याप देखिल शौच्छालयाबद्दल जनजागृती न झाल्याचे दिसुनयेत आहे.तसेच काही ठिकाणी पाण्या अभावी नागरीक बाहेर जात आसल्याचे म्हटले जाते. तालुक्यात गावामधील बंहुताश नागरीक हे घरामध्ये शौच्छालय आसुन देखिल याचा वापर न करता उघड्यावर जातात.त्यामुळे शौच्छालय केवळ शोभेची वस्तुच बनत आहे.तसेच काही शाळा,तलाठी कार्यालय,व ग्रामपंचायतीच्या शौच्छालयाची अवस्था बिकट झाली आहे.तर काहु ग्रामंपचायतीना आजुन शौच्छालयच उपलब्ध नाही.अनेक गावात पांणदच्या ठिकाणी ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहेत.यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.ग्रामीण भागातील जनतेमध्ये जनजागृतीचा अभाव दिसुन येत आहे.विशेष मोहीम राबवुन किंवा एखाद्या पथकाची नेमनुक करून ग्रामीण भागात जनजागृती करण्याची मागणी प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)सावळदबारा यांनी केली आहे.चौकट-
गावातील पोलीस पाटील,सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य या बाबतीत लक्ष देण्याचे काम आहे.शौच्छालयाचे काम पुर्ण झाल्यामुळे आता गुडमाॕर्निंग पथक कार्यान्वित नाही.सोयगाव तालुक्यातीत गावे व पाडेमिळुन 85 आसपास असुन ४५ ग्रामपंचायती आहेत. बेसलाईन अंतर्गत तालुकाभरामध्ये 4 ते 6 हजार शौच्छालय आहेत.याला आळा घालण्यासाठी तालुका स्तरावर पथक नेमलेले पाहीजे.राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनिल माकोंडे सावळदबारा.
चौकट- तालुक्यात पाण्या अभावी नागरिकांना बाहेर शौच्छास जावे लागते.त्यामुळे नगर पंचायत व ग्राम पंचायत च्या वतीने स्वच्छ भारत या योजनेतून नागरिकांसाठी सार्वजनिक सौच्यालाय बांधण्यात आले पाहिजे.
–महेशसिँह(सोनू) ठाकूर
देव्हारी ता.सोयगाव
Users Today : 12