औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे येत्या डिसेंम्बर महिन्यात औरंगाबाद येथे सकल राजपूत समाजाचा भव्य मेळावा शासनाच्या वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे,त्या अनुषंगाने शुक्रवार (त,१८)नोव्हेंबर रोजी या अनुषंगाने जाणीव
जागृती अंतर्गत समाजातल्या तळागाळातिल घटकाने या मेळाव्यात उपस्थित राहावे यासाठी येथील रामलिला मैदानावर राजपूत समाजाची बैठक आयोजक आर,के,सिंह , प्रवीणसिंह राठोड,तसेच समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते तोताराम राठोड,कंवरसिंह बैनाडे,देवीचंद बारवाल, डॉ,जीवन राजपूत,महेंद्रसिंह ठाकूर,श्री, चांदा साहेब,धोंडीरामसिंह राजपूत, जगतसिंह परिहार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली,बजाजनगर मध्ये बिहार, उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,राजस्थान व विदर्भ,जळगाव ,बुलढाणा, नाशिक,अहमदनगर येथील हजारो राजपूत नौकरीला आहेत या बैठकीत या सर्वांनी आपापसातील गट,तट, हेवेदावे सोडून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी व समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी “हम सब एम है”चा एल्गार देत एकीचे दर्शन घडविले,या मेळाव्यात एक लक्ष राजपूत/परदेशी येतील अशी अपेक्षा आहे,गाओ गावी जाऊन मेळाव्या बाबत जागृती करण्यात येणार आहे.शासनाकडे समाजाच्या विविध मागण्या सादर करन्यात येणार आहेत, या विमुक्त जातीचे प्रमाण पत्र,वैधता प्रमाण पत्र, विना विलंब मिळावे,महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे,शासकीय वसतिगृह राणा प्रताप सिंह यांच्या नावे काढण्यात यावे व राणा प्रताप सिंह यांची जयंती
शासकीय पातळीवर साजरी करून त्या दिवशी सुट्टी जाहीर करावी,असे श्री बहुरे यांनी विशद केले,कवरसिंह बैनांडे,देवीचंद बरवाल,धोंडीराम राजपूत,बचूसिंह राजपूत,यांनी समाजाच्या एकतेवर एकजुटीचे आवाहन केले,पदम राजपूत,चंदा राजपूत, विजयसिंह झाला,याची ही भाषणे झाली,हा मेळावा राजकीय मेळावा स्टेज नाही याचे भान सर्वानी ठेवावे असेही नमूद करण्यात आले. मेळाव्यात ग्रामीण भागातील राजपूत समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक करून आभार आर.के.सिंग यांनी मानले, या बैठकीत बजाज नगर शिवाय आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिक, कामगार, अधिकारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 12