बुलढाणा जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री बंद करा अन्यथा
लोणार तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील इतरही तालुक्यात गुटखा बंदी असताना सुद्धा राजरोस पणे विकल्या जाणारा गुटखा विक्री बंद करण्यासाठी बिबी येथील महिलेलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
लोणार तालुक्यातील बिबी येथील सुनिता भांड,लता घाईत व जिजा सदावर्ते या महिलांनी लोणार तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील अवैध गुटखा विक्री बंद करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे,की अन्न व औषध प्रशासन सुरक्षा अधिकारी यांच्या आशिर्वादाने जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री चालु असुन अवैध गुटखा विक्रीमुळे जिल्ह्यातील लाखो तरुणांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना मानसिक,शारीरिक व आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासन सुरक्षा अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावी व अवैध गुटखा विक्री २० नोव्हेंबर पर्यंत बंद करण्यात यावा.अन्यथा २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत यावेळेत कधीही जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आत्मदहन करण्यात येईल याची पूर्ण जबाबदारी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याची राहील,असे निवेदन नमूद करण्यात आले आहे.
Users Today : 30