नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे)_विविध सामाजिक व अध्यात्मिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मता व एकोप्याची भावना वाढविण्याचा सर्वांगीण दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून नांदुरा शहर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने शहराध्यक्षा तथा जेष्ठ समाजसेविका सौ. सारिकाताई राजेश डागा यांच्या नेतृत्वात विविध प्रकारचे सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम नेहमीच राबविले जातात. त्याच अनुषंगाने नांदुरा शहर भाजपा महिला मोर्चा व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने एकादशीच्या निमित्ताने रविवार दि. २०/११/२०२२रोजी भव्य सत्संग कार्यक्रमाचे आयोजन नांदुरा खुर्द येथील भवानी माता मंदीर येथे करण्यात आले होते._या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून झांबड विद्यानिकेतनच्या मा. संचालिका सौ. मिनाताई झांबड उपस्थित होत्या. यावेळी भव्य दिव्य अशा सत्संगाच्या माध्यमातून उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले._यावेळी नांदुरा शहराध्यक्षा तथा जेष्ठ समाजसेविका सौ. सारिकाताई डागा यांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यातुन अध्यात्म व राजकीय पक्ष जेव्हा सोबत येतात तेव्हा त्यातुन एक अलौकिक, दिव्य व तेजस्वी रूप बघायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले._यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅप्पीनेस कोर्स शिक्षिका सौ. रंजनाताई सोनवणे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरून भाजपा महिला मोर्चाच्या बुलढाणा जिल्हा सचिव सौअनिताताई चौधरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सौ. सिंधुमतीताई राखोंडे यांची नांदुरा शहर भाजपा महिला सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.नांदुरा शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळून आध्यात्मिक एकात्मतेचे महत्व अधोरेखीत झाले. या कार्यक्रमासाठी भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सिंधुमतीताई राखोंडे यांनी केलेले नियोजन अद्वितीय व वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली._या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नांदुरा शहर भाजपा महिला मोर्चा व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
Users Today : 30