छत्रपती षिवरायांप्रती बेताल वक्तव्य करणा-यांची हकालपट्टी करा – निलेष अंजनकर

Khozmaster
3 Min Read

चिखलीत तालुका व शहर कॉंग्रेसने काळया फिती बांधून नोंदविला जाहीर निषेध चिखली: नोव्हेंबर 2022हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती षिवाजी महाराजांचा ऐकरी उल्लेख करून छत्रपतींची तुलना चुकीच्या पध्दीतीने करीत राज्यपाल भगतसिंग कोष्यारी व भाजपाच्या प्रवक्ते सुधांषु त्रिवेदी यांनी बेताल वक्तव्ये करून छत्रपती षिवरायांचा अवमान केला आहे. छत्रपती षिवरायांचा वारंवार होणारा अवमान यापुढे सहन केल्या जाणार नसुन येत्या काळात जषास तसे उत्तर दिल्या जाईल असा ईषारा देत चिखली तालुका व शहर कॉग्रेसच्या वतीने काळया फिती बांधुन चिखली येथे निषेध नोंदविण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोष्यारी हे वारंवार छत्रपती षिवाजी महाराज व व इतर महापुरूषांप्रती अवमानकारक शब्दातुन उल्लेख करतात तर त्यांनी केलेल्या विधानामुळे जनभावना दुखावल्याने राज्यातील सुखषांती, कायदा व सुव्यवस्था, अडचणीत येत आहेत तर ज्या राज्यपाल व भाजपा प्रवक्त्यांना महापुरूषांचा आदर राखता येत नसेल त्यांची तात्काळ हकालपट्टी करा अषी मागणी कॉग्रेस नेते माजी नगरसेवक निलेष अंजनकर यांनी केली आहे.चिखली तालुका व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपाल कोष्यारी व भाजपा प्रकक्ते त्रिवेदी यांनी केलेल्या विधानांचा जयस्तंभ चौक येथे प्रचंड नारेबाजी करीत काळया फिती बांधुन जाहीर निषेध केला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोष्यारी हे वारंवार वादग्रस्त विधाने करून महापुरूषांचा अवमान करीत आहे. छत्रपती षिवरायांचा अवमान यापुढे महाराष्ट्रातील षिवप्रमी सहन करणार नसुन वय झालेल्या व विषिष्ट पक्ष विचारसारणीने झपाटलेल्या राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अषा स्वरूपाच्या चिखलीतील कॉग्रेस पदाधिका-यांच्या संतप्त प्रतिक्रया व्यक्त करण्यात आल्या. अखंड हिंदुस्थान स्वराज्य संकल्पना प्रत्यक्षात उतरविणा-या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती षिवाजी महाराजांबध्दल बेताल वक्तव्य करून राज्यपाल कोष्यारी यांनी महाराष्ट्रासह तमान हिंदुस्थानातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांना तत्काळ पदावरून पायउतार करावे अषा स्वरूपाची संतप्त प्रतिक्रीया तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर यांनी यावेळी व्यक्त केली. तर यापुढे महाराष्ट्रात भाजपाचे प्रवक्ते असो की पदाधिकारी यांनी छत्रपती षिवाजी महाराज सोडा कोणत्याही महापुरूषांचा अवमान केला तर त्याचे उत्तर जषास तसे दिले जाईल अषा स्वरूपाची प्रतिक्रीया देत या बेताल वक्तव्य करणा-यांचा शहर कॉग्रेसच्या वतीने अध्यक्ष अतहरोद्यीन काझी यांनी निषेध नोंदविला.तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, शहर अध्यक्ष अतहारोद्यीन काझी, डॉ.मोहमंद इसरार, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, नगरसेवक रफिक सेठ, आसिफ भाई, दिपक खरात, गोपाल देव्हडे, गोकुळ षिंगणे, प्रदिप पचेरवाल, निलेष अंजनकर, पप्पु जागृत, अॅड. प्रषांत देषमुख, डॉ. अमोल लहाने, डॉ. संजय घुगे, गजानन परीहार, रामधन मोरे, समाधान गिते, रमजान चौधरी, अकिल खान, खलील बागवान, बाळु साळोख, कैलास जंगले, मोहित घुगे, शेख अफजल, विजय जागृत, अब्रार बागवान, जका भाई, राजीक कुरेषी, प्रकाष सपकाळ, पवन मिसाळ, दत्तात्रय करवंदे, परमेष्वर साळवे, शेख अजिम भाई,षेखर देषमुख, अनिल राठोड, अंकुष गुंजकर, लक्ष्मण भिसे, संजय गिरी, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

0 9 4 6 8 2
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *