ज्ञानेश्वर सुपेकर लोणार:स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये चांगली चांगले यश मिळवले.कराटे या क्रीडा प्रकारामध्ये वर्ग 10 वी ची विद्यार्थिनी कु. ऋतुजा अनिल मापारी हिने 17 वर्षांखालील 57 की. वजनी गटामध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक तर वर्ग 10 वी ची दुसरी विद्यार्थिनी कु.साक्षी सुनिल खंदारे हिने 17 वर्षांखालील 47 की. वजनी गटामध्ये जिल्हा स्तरावर दुसरा क्रमांक मिळवला व दोन्ही विद्यार्थिनी विभागीय स्तरावर खेळण्यासाठी पात्र झाल्या तसेच कबड्डी या क्रीडाप्रकारात मुलांचे 14 वर्षांखालील,17 वर्षांखालील व 19 वर्षांखालील या तीनही गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला व हे तीनही गटाचे संघ जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरले.या सर्व विजयी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक ए. के मापारी सर यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राचार्य, उपप्राचार्य ,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Users Today : 32