जिल्हा परिषद शाळा अंतरवाली खांडी येथे आनंदनगरी उत्साहात साजरी

Khozmaster
2 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूतआमचे साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज चैनल संभाजीनगर शहर ज्ञानेश्वर तांबे यांनी दिलेल्या माहिती पैठण तालुक्यातील खांडी अंतरवाली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोड केंद्राचे केंद्रप्रमुख बळीरामजी भुमरे सर व गावचे सरपंच रामनाथ डिगोळे, उपसरपंच नवनाथ कळमकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकरराव ढाकणे, उपाध्यक्ष संतोष दसपुते, गजानन डिघुळे, यांच्या हस्ते आनंदनगरीचे उद्घाटन करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या बाजाराला सुरुवात झाली या आनंदनगरी मध्ये विद्यार्थ्यांनी आपापले खाद्यपदार्थाचे स्टॉल लावलेले होते यामध्ये खाद्यपदार्थांमध्ये समोसा ,पोहे, पाणीपुरी, मटकी उसळ, पुरी भाजी, बटाटा वडा, पापड, जिलेबी, गुलाब जामुन, भजे, कढी, इडली ,सांबर,भाजी पाला, अशा घरगुती बनवलेल्या रुचकर व स्वादिष्ट पदार्थाची खमंग या शाळेच्या परिसरामध्ये दरवळून गेला होता.यावेळी विद्यार्थीनी आपापल्या शेतातील उपलब्ध भाजी, पाला, आणून व्रिक्री केला यातुन विद्यार्थ्यांनी व्यवहार, ज्ञानाचा बोध घेतला तसेच सरपंच रामनाथ डिघुळे आणि गावकरी पालक आणि शिक्षक वृंद यांनी मुलांकडून नगद स्वरूपात फळे,आणि खाद्य पदार्थ व भाजीपाला खरेदी केला. त्यावेळी गावातील पालक नागरिक यांनी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला.व आपल्या पाल्याच्या दुकानदारीत लगबग पाहून पाल्यांच्या डोळ्यात कौतुकाचे भाव दिसुन येत होते. विद्यार्थ्यांनी आपले भाजी पाला व खाद्य पदार्थाची मांडणी बाजार प्रमाणे केली होती, त्यामुळे शाळेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.  तसेच भारत अभियान अंतर्गत मातांची बैठक घेऊन केंद्रप्रमुख बळीरामजी भुमरे सर यांनी मातांना मार्गदर्शन केले. यावेळी गावचे सरपंच रामनाथ डिघुळे,शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब वाडेकर, शिक्षक राजेश खिल्लारे सर, काकासाहेब जाधव ,ज्योती बुरकुले, शोभा पोहरे ,ज्योती कराड, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक कृष्णा डिघुळे, कृष्णा जायभाये, विष्णू ताठे, वासुदेव डिघुळे, भागीरथी डिघुळे, तसेच अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कदम, श्रीमती बेळगे मॅडम, वाघ मॅडम यांच्यासह गावातील महिला व पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

 

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *