राजपूत /परदेशी संघटीत होण्याचे फायदे

Khozmaster
2 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर राजपूत/परदेशी समाज हा मूळचा भटका समाज,ह्या गावाहून त्या गावी जाणारा, दुसरे असे की या देश चा मूळ रहिवाशी हा राजपूत समाजच आहे,देशावर जेंव्हा जेंव्हा संकटे आली, परकीय सत्तानी भारतमातेवर आक्रमण केले तेंव्हा-तेंव्हा या समाजातील शूरवीरांनी,लढवैयांनी शत्रूशी सामना केला सर्वां पुढे राजपूत/परदेशी समाजाचेच योद्धे राहत,ते शूर, लढवैय व मागे न हटणारे तसेच देश,मातृभूमी शी एकनिष्ठ राहणार हा समाज काल होता,आज आहे,व उद्याही राहणार आहे,देशसेवेला प्राधान्य देणारा,भारतमतेसाठी प्राणांची आहुती देणारा हा समाज आजही विखुरलेल्या अवस्थेत आहे,त्यांच्या या विखुर अवस्थेचा लाभ शत्रूंनी घेऊन,काही स्वार्थी मंडळींनी घेऊन या समाजाला मागे ठेवले,आजही या समाजाला शिक्षण महत्व माहित नाही,मुलांना लहान पनापासून दुग्ध व्यवसाय, मोल मजुरी,शेती,शेतकामगार,रोजनदारी मजुरी,हमाली,चाकरी,कामगार,हमाल,हातगाडी चालवून पोट भरणार समाज आपल्या मूलभूत हक्का

पासून,घटनात्मक अधिकार पासून कोसो दूर आहे,म्हणून शासनाने या जातीचा,त्यांच्या मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून त्यांना “विमुक्त जाती”या मागास प्रवर्गात टाकले आहे,मात्र काही समाज कंटक या समाजाच्या या बाबीला विरोध करून या समाजाविरुद्ध कट,कारस्थान रचत आहे. हे कट कारस्थान थांबवे,व शासनाही या समाजाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आथिर्क विकास मंडळ स्थापन करावे. व या समाजाच्या तळा गाळातील घटकांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्याचा विकास साधावा या जातीच्या विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी विद्यार्थी वस्ती गृह बांधावी “सबका साथ-सबका विकास ” साधावा हि अपेक्षा आज महाराष्ट्रात यु.पी.बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान येथील राजपूत लाखोंच्या संख्येने आहेत त्यांची ही एका छताखाली येण्याची तीव्र इच्छा आहे. समाजात काही अनिष्ट रुढी, परंपरा आहे. त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे, विकार, व व्यसनाना आळा बसावा देशाच्या उज्वल भवितव्यासाठी व सक्षम करण्यासाठी या समाजातील युवकांचे सहकार्य मिळावे हे सर्व तेव्हाच शक्य आहे. जेव्हा सर्व राजपूत/परदेशी एका छताखाली येतील यासाठी संघटित होणे अत्यंत गरजेचे आहे, धोंडीराम ध राजपूत, न्यू सन्मित्र काँलनी वैजापूर जि.औरंगाबाद मो.९४२१३१२२४४

 

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *